ETV Bharat / city

कृषी कायद्याचा विरोध करत काँग्रेसने जाळले नरेंद्र मोदींचे फलक; कायदा रद्द करण्याची मागणी - nagpur congress against farmer bill

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून आज नागपुरात निदर्शने करण्यात आली.

congress protest in nagpur
कृषी कायद्याचा विरोध करत काँग्रेसने जाळले नरेंद्र मोदींचे फलक; कायदा रद्द करण्याची मागणी
author img

By

Published : Dec 3, 2020, 4:32 PM IST

नागपूर - नव्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून आज नागपुरात निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेल्या पोस्टरचे दहन करण्यात आले. तसेच कृषी कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शहरातील देवडीया काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

कृषी कायद्याचा विरोध करत काँग्रेसने जाळले नरेंद्र मोदींचे फलक; कायदा रद्द करण्याची मागणी

कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच विरोधीपक्ष काँग्रेसनेही याला पाठिंबा दिलाय. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.

कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे मोदी सरकार या कायद्यातून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कृषी कायदा व्यापारी आणि उद्योजकांच्या हिताचा आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होणार आहे. अशावेळी कायदा रद्द होण्याची मागणी जोर धरत आहे. यालाच पाठिंबा देण्यासाठी मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात शहरातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.