ETV Bharat / city

नगापुरात रविवारी तब्बल 22 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला मेट्रोने प्रवास

author img

By

Published : Dec 28, 2020, 4:18 PM IST

सलग आलेल्या सुट्यांमुळे नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल २२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास केला आहे. यासंदर्भातील आकडेवारी महामेट्रोकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Nagpur Metro Latest News
नागपूर मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी

नागपूर - सलग आलेल्या सुट्यांमुळे नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल २२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोमधून प्रवास केला आहे. यासंदर्भातील आकडेवारी महामेट्रोकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी ८ वाजेपासून नागपूरमधील प्रमुख मेट्रो स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सीताबर्डी मेट्रो स्थानक, तसेच ऑरेंज लाईन मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांमध्ये आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील झांसी राणी चौक येथील मेट्रो स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली होती. शहरामध्ये 25 किमी अंतराचे मेट्रोचे जाळे आहे. प्रत्येक मार्गिकेवर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो ट्रेन सोडण्यात येते.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना

महामेट्रोच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. प्रवाशांना प्रवासादरम्यान आपली सायकल मेट्रोमधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सोय मेट्रो प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रोच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच शहराती प्रतिष्ठीत व्यक्तींना मेट्रोमधून प्रवास करण्याचे आमंत्रण दिले जात आहे. व त्यांच्या माध्यमातून नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोविड नंतर सुरू झालेल्या मेट्रो सेवेचा वाढता रायडरशीप ग्राफ पुढील प्रमाणे

27/12/2020: 22000
20/12/2020:- 17562,
13/12/2020:- 15404,
06/12/2020:- 13187,
29/11/2020:- 11488.

कोविड पूर्वी (रविवार रायडरशीप)

26-01-2020 :- 21258,
09-02-2020 :- 17968,
02-02-2020 :- 17749,
16-02-2020 :- 16579,
23-02-2020 :- 13726.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.