ETV Bharat / city

Raj Thackeray Vidarbha Visit : महापालिका निवडणुकांपूर्वी संघटनेत मोठे फेरबदल केले जातील; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या ( Nagpur Municipal Corporation Election ) आधी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जातील असे स्पष्ट संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. मनसे उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे.

author img

By

Published : Sep 18, 2022, 2:12 PM IST

Muncipal Election 2022
नागपूर महानगरपालिका निवडणुक

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली (Raj Thackeray Vidarbha tour start today) आहे. आज सकाळी राज ठाकरे यांचे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत मनसेचे नेते आणि पदाधिकारी आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपूरसह विदर्भातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. राज ठाकरे नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष केला. (municipal elections in vidarbha )

या शहपरांमध्ये असणार दौरा : राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भात मुक्कामी असणार आहेत. यादरम्यान ते नागपूर, चंद्रपूर तसेच अमरावती शहराचा दौरा करणार ( Raj Thackeray plan strategy municipal elections ) आहेत. आगामी काळात विदर्भातील तीन शहरातील महानगरपालिका निवडणूका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याचे नियोजन केले आहे.

नागपूरच्या रवी भवन येथे कार्यकर्त्यांसोबत बैठका : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जातील असे स्पष्ट संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. निवडणुकांना आद्यप वेळ शिल्लक असला तरी आत्तापासूनच कामाला लागा,तयारी करा असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. महानगरपालिका निवडणूकांमध्ये यावेळी सक्षम उमेदवार दिले जातील, त्यामुळे मनसे उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरच्या रवी भवन येथे कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू झालेले आहेत. पुढील दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी राज ठाकरेकडून नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे, त्यानंतर उद्या जिल्ह्यातील सहा मतदारसंघाची राज ठाकरे परिस्थिती जाणून घेतील.

रेल्वे स्टेशन ते हॉटेल पर्यत राज यांची रॅली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आज राज ठाकरेंचे नागपुरात आगमन झाल्यानंतर रेल्वे स्टेशन ते मुक्कामी असलेल्या हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

असा आहे, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा शेड्युल : राज ठाकरेंचे आज नागपूरला झाले आहे. आता पुढील दोन दिवस (१८,१९) नागपूरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनंतर २० सप्टेंबरला राज ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे. २१ सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीला रवाना होतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते २२ सप्टेंबरला रात्री अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील. ( Vidarbha tour start )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.