नागपूर - आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी विधानपरिषद निवडणूक ( MLC Election 2022 ) लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले. आमदारांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधानपरिषदेचे आम्ही चमत्काराससाठी नाही तर पाचवा उमेदवार दिला नाही तर त्याचे नियोजनपूर्व आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे. भाजपचा पाचवाही उमेदवार निवडणून येईल, असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ( MLA Sudhir Mungantiwar ) यांनी व्यक्त केले. ते नागपुरात विभागीय भाजपकार्यलयात माध्यमांशी बोलत होते.
मतदारांशी विश्वासघात केला गद्दारी केली - 24 ऑक्टोबर, 2019 रोजी भाजपशी धोका झाला. सेनेने युती तोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत मतदारांशी गद्दारी केली. आता जैसे करम केले तसेच फळ देईल. ज्यांनी मतदारांशी विश्वासघात केला गद्दारी केली. तेच लोकं गद्दारी आणि धोका केल्याची गोष्ट सांगत आहे. हे जगातील आठवे आश्चर्य असल्याची भावना बोलून दाखवली म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला ( Shivsena Leader Sanjay Raut ) लगावला.
खरा शिवसैनिक कधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान करणार नाही - शिवसेनेचे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असतील तर त्यांचे काही चुकले नाही. शिवसेनेच्या आमदाराना जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा सर्व आमदारांना आवाहन आहे. त्यांनी 1966 मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते ते एकदा ऐकावे. ते एकदा ऐकले तर शिवसेनेचा खरा आमदार कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीवर प्रेम आहे जे बाळासाहेबांचे विचारांना विसरले असतील तेच मात्र मतदान करतील, असा टोलाही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.
सेनेच्या राऊतांच्या प्रश्नांची उत्तर हजारो वर्षाच्या संशोधनानंतरच सापडेल - आमदारांच्या सदसद्विवेकबुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणणे, डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा आहे, असे म्हणणे, पाप केल्याने कोरोना होत असे म्हणणे, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही, असे म्हणणे हजारो वर्षाच्या संशोधनानंतर अशा प्रश्नांची उत्तरं शोधता येईल, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर लगावला. संजय राऊत यांनी आज भाजप चोऱ्या माऱ्या करून विधानपरिषदेत मतदान मिळवतील अशी टीका केली होती. त्यालाच सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.
हेही वाचा - Jwala Dhote : भाजपा पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊ शकते, मग मी का नाही?, ज्वाला धोटेंचा पोलिसांना सवाल