ETV Bharat / city

Shivsena Agitation : उमरखेडमध्ये शिवसैनिक संतप्त, आमदार संजय राठोडांचा पुतळा जाळला - आमदार संजय राठोड

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) यांनी आमदारांचा मोठा गट फोडल्यानंतर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संताप कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये शिवसैनिकांनी माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. मतदारसंघात आल्यात त्यांना बदडून काढू असा इशाराही या शिवसैनिकांनी आंदोलनावेळी दिला.

Shivsena Agitation
Shivsena Agitation
author img

By

Published : Jun 26, 2022, 5:29 PM IST

यवतमाळ - शिवसेनेमध्ये झालेल्या मोठ्या बंडखोरीमध्ये माजी पालिक मंत्री, आमदार संजय राठोडही सहभागी झाले आहेत. त्यामुळे यवतमाळच्या उमरखेडमधील गायत्री चौकात शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) व माजी पालक मंत्री संजय राठोड यांची पुतळे ( Agitation Against MLA Rathod ) जाळले. पक्षासोबत गद्दारी करून बंड करण्याऱ्याचं करायचं काय खाली मुंडकं वरती पाय, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी या नेत्यांच्या प्रतिमांना चपला मारल्या. सर्व शिवसैनिकांनी आपण राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली.

आमदार संजय राठोड यांच्या निषेधार्थ उमरखेडमध्ये शिवसैनिकांची निदर्शने

शिवसैनिक ठाकरेंसोबत - या शिवसैनिकांनी आमदार राठोड यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. आपण सर्वजण शिवसेनेसोबत असल्याचे सांगतानाच या शिवसैनिकांनी आमदार राठोड मतदारसंघात आल्यास त्यांना बदडून काढले जाईल, असा इशाराही दिला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असून विरोधकांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा विश्वास या शिवसैनिकांनी व्यक्त केला.

बंडखोरीविरोधात तीव्र पडसाद - एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह केलेल्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचाच एक भाह म्हणून उमरखेडच्या शिवसैनिकांनी गायत्री चौकात हे आंदोलन केले. राठोड यांचा पुतळा जाळण्याच्या या आंदोलनात शिवसेनेचे नेते चितांगराव कदम, एडवोकेट बळीराम मुटकुळे, राजीव खांमनेकर, प्रशांत पत्तेवार, अरविंद भोयर, सतीश नाईक, संदीप ठाकरे, अमोल तीवरंगकर, गजेंद्र ठाकरे, रेखाताई भरणे, राहुल सोनवणे, वसंता देशमुख, निलेश जैन, संजय पळसकर, बालाजी लोखंडे, अमोल नरवाडे आदीसह शिवसेनेचे तालुका व शहर, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, युवा सैनिक सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.