ETV Bharat / city

Minor Lover Couple Suicide Nagpur : धक्कादायक.. अल्पवयीन प्रेमीयुगुलाची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या - Kamathi Police Station Nagpur

नागपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली ( Minor Lover Couple Suicide Nagpur ) आहे. नागपूरच्या कामठी पोलीस ठाण्याच्या ( Kamathi Police Station Nagpur ) हद्दीत ही घटना घडली आहे.

नागपूर कामठी पोलीस ठाणे
नागपूर कामठी पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 12, 2022, 7:17 PM IST

नागपूर : नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ( Kamathi Police Station Nagpur ) अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली ( Minor Lover Couple Suicide Nagpur ) आहे. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललेले असल्याची चर्चा आहे.

धक्कादायक.. अल्पवयीन प्रेमीयुगुलाची धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या

दोन दिवसांपासून होते बेपत्ता

आत्महत्या करणाऱ्या मुलाचे वय 18 तर मुलगी ही 16 वर्षांची असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमी युगुल गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते,या संदर्भात मुलगा आणि मुलीच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार नवीन कामठी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. कुटुंबीय आणि पोलीस आपला शोध घेत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा प्रेमी युगुल दुचाकीने कन्हान नदीवरील पुलावरील रेल्वेरुळावर पोहचले. त्यांनी एकमेकांचा हात-हातात घेऊन धावत्या रेल्वे गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली.

पहाटे घटना उघडकी आली

शुक्रवारी रात्री उशिरा प्रेमी युगुलाने एकमेकांचे हात-हातात घेऊन आत्महत्या केल्यानंतर पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकी आली. घटनेची माहिती समजताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले,तेव्हा दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर घटनेची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

कुटुंबीयांना प्रेमाला विरोध

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार प्रेमीयुगुल एकाच परिसरातील राहणारे आहेत.त्यांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती,त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. वाद वाढत असल्याने दोन दिवसापूर्वी हे प्रेमीयुगुल घरून पळून गेले होते. मात्र घरचे आपल्याला वेगळे करतील या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.