नागपूर - अंधश्रेद्धेतून आई-वडील आणि मावशीनेच भूतबाधा झाली म्हणून सहा वर्षीय चिमुकलीला केलेल्या बेदम मरहाणीत मृत्यू झाला. यात तिघांना अटक केली होती. या प्रकरणात अंधश्रद्धेतुन मांत्रिकाचे ऐकून मुलीला पूजा पाठ करत ( Black Magic Girl Death ) मारहाण केली. या सगळ्या घटनेचे विडिओ रेकॉर्ड तपासात हाती लागले आहे. यात मांत्रिक आणि यासोबत मृतक मुलीची 16 वर्षीय मोठी बहीण आणि 11 वर्षीय मावशीचा मुलगा याने सुद्धा मारहाण ( Nagpur crime news ) केल्याचे दिसून आले. त्यांनाही पोलिसांनी उशिरा रात्री ताब्यात घेतले आहे.
सहा वर्षीय मुलगी हे बोबडे बोल बोलत होती. काहीतरी वेगळेच बोलत असल्यामुळे तिला भूतबाधा झाल्याचा कुटुंबांचा गैरसमज झाला. मांत्रिकाच्या सांगण्यावरून पूजा पाठ करत उपचार म्हणून तिला गंभीरित्या बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण होत असताना तिला शरीरावर गंभीर इजा झाल्याचेसुद्धा समोर आलेले आहे. तसेच मुलीचे शविच्छेदन ककरण्यात आले आहे. हा अहवाल येणे बाकी आहे. यात प्राथमिक अंदाजावरून मुलीच्या मेंदूजवळ रक्तस्त्राव झाल्याने तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असल्याची माहिती राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( PI Dipak Bhitade ) दीपक भिताडे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.
बाल न्यायालयात हजर करणार- या याप्रकरणात मांत्रिकाला न्यायालयात सादर करणार आहे. तसेच मुलगी आणि मावशीच्या मुलग हा मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसून आहे. त्यांचाही या गुन्ह्यात सामावेश असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील करवाईसाठी त्यांना बाल न्यायालयात हजर करणार आहे. त्यानंतर पुढील करवाई केली जाईल अशीही माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भीताडे यांनी दिली.
तिघांनी चिमुकलीला बेदम मारहाण केलीनागपूरच्या सुभाष नगर भागात राहणारे सिदार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांना दोन मुली आहेत. एक मुलगी ही 16 वर्षाची असून दुसरी ही सहा वर्षाची आहे. यात पोलिसांनी जेव्हा तपासा दरम्यान विचारपूस केली. तेव्हा ती काही तरी संस्कृतमध्ये बडबड करत असल्याचे सांगत तिला भूतबाधा झाली असा दावा आई वडिलांनी केला. सिदार्थची मेव्हणी प्रिया अमर बनसोड हिने ही भोंदू बाबांच्या मनाने ऐकून तिघांनी चिमुकलीला बेदम मारहाण केली. मागील 15 दिवसांपासून सातत्याने हा प्रकार सुरू होता. अखेर शुक्रवारी झालेल्या बेदम मारहाणीत सहा वर्षीय चिमुकली निपचित पडली. जेव्हा तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.