ETV Bharat / city

Nitin Gadkri On Metro : नागपुरातून 'या' शहरापर्यंत धावणार ब्रॉडगेज मेट्रो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर शहरातून लवकरच मेट्रो ( Nagpur Metro ) धावणार आहे. त्यामुळे नागपूरकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. रेल्वे बोर्डाची या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी दिली. नागपूर-रामटेक मार्गावर ही मेट्रो धावणार आहे, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Jul 11, 2022, 10:47 AM IST

नागपूर - लवकरच नागपुरातून काही महत्त्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो ( Nagpur Metro ) धावणार आहे. रेल्वे बोर्डाची प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी दिली. ते नागपूरातील मिनी माता नगर परिसरात विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.

नागपूरकरांचा प्रवास होणार सुखाचा - पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रती तास वेगाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचे स्वप्न होते. मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की, रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, असे गडकरी म्हणाले.

न्यायपालिकेवर विश्वास ठेवला पाहिजे : न्यायपालिकेच्या निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. मात्र, न्याय लवकर मिळाले पाहिजे, हे ही तेवढेच आवश्यक आहे. तसेच, निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार त्यात कोणाचा हस्तक्षेप असू नये. मी काही कंपन्या उशिरा न्याय मिळाल्यामुळे बुडताना पाहिल्या आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही योग्य वेळेतच मिळाली पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले आहेत.

सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता विस्तार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. पण, सुरुवातीला तुम्ही बँकेतून 50 कोटीचे कर्ज घेऊन विद्यापीठ उभारले आहे. या कर्जाचा काही भाग तुम्ही फेडलाही आहे. त्यामुळे भविष्यात लॉ युनिव्हर्सिटीने आणखी कर्ज घेऊन विस्तार करण्याचा विचार ठेवावा. कारण फक्त सरकारी अनुदानावर शैक्षणिक संस्थेने अवलंबित राहू नये, असेही ते म्हणालेत. निश्चित निधी कमी पडणार नाही. पण केवळ सरकारच्या मदतीची अपेक्षेपेक्षा ज्यांना गरीब गरजूंना गरज आहे त्यांना मोफत द्या पण जे देऊ शकतात त्याच्याकडून घ्या असाही सल्ला त्यांनी उदघाटन प्रसंगीं बोलतांना दिला आहे.

विदर्भात उच्च दर्जाचे मन्युष्यबळ निर्माण होत आहे : नागपूरकर म्हणून अभिमान आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला निधी कमी पडणार नाही, असेही आश्वस्त केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी हे बीज रोपन होत आहे. आमची इच्छा होती की नागपुरात विधी विद्यापीठ व्हावे. आज तो स्वप्न साकार होत आहे. नागपूर किंवा विदर्भात उच्च दर्जाचा मनुष्यबळ निर्माण होत नाही तोवर विकास होऊ शकत नाही. सामान्यतः जिथे आर्थिक विकास असते तिथे चांगला शिक्षण ही पाहायला मिळते, त्यामुळे लोकांना वाटते की तिथे आर्थिक विकास आहे, म्हणून चांगले शिक्षण आहे. मात्र, प्रत्यक्षात सत्य यापेक्षा विपरीत असते. जिथे चांगला शिक्षण असते, तिथे आर्थिक विकास होते. चांगला शिक्षण, दर्जेदार मनुष्य बळ हे विकासासाठी चुंबकाचे काम करते असेही फडणवीस म्हणालेत.

अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर न्यायव्यवस्था मजबूत पाहिजे : भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर आमची न्यायव्यवस्था ही मजबूत असणे आवश्यक आहे. आमची न्यायव्यवस्था आधीच मजबूत आहे. कारण त्याची विश्वासहर्ता टिकून आहे. आणि महाराष्ट्र नेशनल लॉ युनिव्हर्सिटी सारख्यासंस्थांमुळे भविष्यात चांगले वकील आणि न्यायाधीश निर्माण होतील. कोणत्याही संस्थेचे परिसर किंवा वसतिगृह फक्त राहण्याची जागा नसते, तर कधी कधी ते प्रेरणेचे ठिकाण असते. लंडनमध्ये शिकताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घरही असेच प्रेरणापुंज बनले आहे. तसेच स्वतःच्या अस्तित्वाने या विद्यापीठाच्या स्थान जागतिक पातळीवर व्हावे असाही विश्वास बोलून दाखवला.

हेही वाचा - MLA Santosh Bangar : शिंदे गटात गेल्याने शिवसेनेचा दणका, आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.