ETV Bharat / city

दुकानदारांनासह कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा निर्णय तुघलकी; महापौर जोशींची तुकाराम मुंढेंवर टीका - nagpur mayor sandip joshi

नागपुरात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दुकानदारांना आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करवून घेणे बंधनकारक केले आहे. जे दुकानदार स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करणार नाहीत, त्यांच्यावर महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी दुकानदारांना १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे.

mayor sandip joshi
महापौर संदीप जोशी
author img

By

Published : Aug 15, 2020, 10:21 AM IST

नागपूर - महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व दुकानदार आणि दुकानात कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.

नागपुरात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दुकानदारांना आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करवून घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जे दुकानदार स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करणार नाहीत, त्यांच्यावर महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी दुकानदारांना १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कारवाईला सुरुवात होईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.

महापौर संदीप जोशींची तुकाराम मुंढेंवर टीका

शहरात लाखोंच्या संख्येने दुकाने आहेत, त्यात काम करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. शहरात दररोज केवळ तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. १८ तारखेपर्यंत पाच लाख लोकांची चाचणी कशी करणार? यासाठी एका दिवशी ८० हजार तपासण्या कराव्या लागतील आणि यावर जवळपास कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च आणि इतक्या चाचण्या सद्यस्थितीत शक्य नसल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय तुघलकी व अव्यवहार्य असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.