ETV Bharat / city

यापुढे महापालिका निवडणूक लढवणार नाही - महापौर संदीप जोशी - महापौर संदीप जोशी बातमी

आपल्या वाढदिवशी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यांनी ही घोषणा केली. आपल्या जागेवर पक्षासाठी मेहनत करणारा कार्यकर्ता माझ्या जागी लढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापौर संदीप जोशी
महापौर संदीप जोशी
author img

By

Published : Aug 22, 2020, 5:25 PM IST

नागपूर - नागपूर महानगर पालिकेच महापौर संदीप जोशी यांनी यापुढे महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरपद भूषावल्यानंतर कार्यकर्त्यांना देखील संधी मिळावी या करिता या निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर संदीप जोशी यांची प्रतिक्रिया

'नेत्यांनी निवडणूक लढवायची आणि कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या, हे बरोबर नाही. आज वाढदिवस असल्याने मी ही घोषणा करतोय. पक्षासाठी मेहनत करणारा कार्यकर्ता माझ्या जागी लढेल.' अशी घोषणा संदीप जोशी यांनी यावेळी केली.

हेही वाचा - विदर्भातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात निरव शांतता; मोजक्याच विश्वस्ताच्या हस्ते पूजा

वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधत असताना जोशींनी ही घोषणा केली आहे. या घोषणेनंतर भापजसह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात ते आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणरायाचं आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.