ETV Bharat / city

नागपुरात मारबत उत्सव उत्साहात; विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांनी वेधले लक्ष

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवात काळी आणि पिवळी मारबत (पुतळे ) मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आली. मारबतीच्या या मिरवणुकीत वर्तमान काळातील अनिष्ट चालीरिती आणि समस्यांवर टीकात्मक भाष्य करणारे पुतळे सर्वांच्या केंद्रस्थानी होते.

मारबत
author img

By

Published : Aug 31, 2019, 6:35 PM IST

नागपूर - शहरात आज शनिवारी पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व असलेला मारबत उत्सव उत्साहाने साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात काळी आणि पिवळी मारबत (पुतळे ) मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या मार्गातून ही मिरवणूक काढण्यात आली. मारबतीच्या या मिरवणुकीत वर्तमान काळातील अनिष्ट चालीरिती आणि समस्यांवर टीकात्मक भाष्य करणारे पुतळे सर्वांच्या केंद्रस्थानी होते.

नागपुरात मारबत उत्सव उत्साहात

जागनाथ इतवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत मिरवणूक आणि याच परिसरातील नेहरू चौकातून निघालेली काळी मारबत यांची भेट झाल्यानंतर मिरवणूकीला सुरुवात झाली. दरम्यान, मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. मारबतीचे दर्शन केल्याने सर्व इडा पीडा, रोगराई, दुःख नाहीसे होतात, अशी लोकांची भावना असल्याने हजारो लोक दर्शनासाठी रस्त्यांवर आले होते.

marbat festival
नागपुरात निघालेली मारबत

या उत्सवा दरम्यान, विविध विषयांवर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये इव्हिएमद्वारे घेतली जाणारी निवडणूक बंद करा आणि जुन्या पद्धतीने 'बेलेट पेपर'द्वारे निवडणूक घ्या. अशी मागणी करणाऱ्या बडग्याने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले होते. यासह माजी अर्थ मंत्री म्हणून देशाला लुटण्याचा आरोप करणारा पी चिदंबरमचा बडगा ही मिरवणुकीत दिसून आला. मारबत मिरवणूकीमध्ये एकेक करुन विविध समस्या आणि वाईट प्रवृत्तीवर बनवलेले बडगे सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. विजय माल्यावर आधारित बडगा देखील लक्षवेधी ठरला तर 'काश्मीर हमारा है, पिओके भी हमारा है' म्हणणारा बडगा आणि मोहम्मद हाफिज आणि काश्मीरमधील दहशतवादावरील बडगा विशेष होता. पुरुषांना स्त्रीविषयक कायद्यांच्या अतिरेकाने वाचवा, पुरुषांना खोट्या प्रकरणात अडकवू नका, असे सांगणारा बडगा सर्व पुरुष मंडळींच्या मनातील भावना सांगून गेला, अशी चर्चा आहे.

Intro:नागपुरात आज पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व असलेला मारबत उत्सव उत्साहाने साजरा झाला…. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात काळी आणि पिवळी मारबत (पुतळे ) मिरवणुकीच्या स्वरूपात काढण्यात आले… शहरातील वेगवेगळ्या मार्गातून ही मिरवणूक काढण्यात आली…. मारबतच्या या मिरवणुकीत बडगे वर्तमान काळातील अनिष्ट चालीरिती आणि समस्यांवर टीकात्मक भाष्य करणारे पुतळे सर्वांच्या अकर्षाच्या केंद्रस्थानी होते.
Body:जागनाथ बुधवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत मिरवणूक आणि इतवारी परिसरातील नेहरू चौकातून निघालेल्या काळी मारबतची भेट झाल्यानंतर मिरवणूकेला सुरुवात झाली... मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती... दोन्ही मारबतीच्या मिरवणुकीत मारबतीचे दर्शन केल्याने सर्व इडा पीडा, रोगराई, दुःख नाहीसे होतात अशी लोकांची भावना असल्याने हजारो लोकं दर्शनासाठी रस्त्यांवर आले होते दोन्ही मारबत चे दर्शन घेत आहेत, आपल्या लहान मुलांना मारबत च्या प्रतिमेला स्पर्श करत दर्शन घडवले...मारबत उत्सवा दरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते....या मध्ये evm द्वारे घेतली जाणारी निवडणूक बंद करा जुन्या पद्धतीने बेलेट पेपर द्वारे निवडणूक घ्या अशी मागणी करणारा बडगा ही मिरवणुकीत साऱ्यांचे लक्ष वेधत होता...या शिवाय माजी अर्थ मंत्री म्हणून देशाला लुटण्याचा आरोप करणारा पी चिदंबरम चा बडगा ही मिरवणुकीत दिसून आला....मारबत मिरवणूक मध्ये एकेक करून विविध समस्या आणि वाईट प्रवृत्तीवर बनवलेले बडगे सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे..विजय माल्या वर आधारित बडगा देखील लक्षवेधी ठरला तर काश्मीर हमारा है, pok भी हमारा है म्हणणारा बडगा आणि मोहम्मद हाफिज आणि काश्मीर मधील दहशतवाद वरील बडगा विशेष होता...पुरुषांना स्त्रीविषयक कायद्यांच्या अतिरेकाने वाचवा, पुरुषांना खोट्या प्रकरणात अडकवू नका असा सांगणारा बडगा सर्व पुरुष मंडळींच्या मनातील सांगून गेला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.