नागपूर भारतात केवळ नागपूरमध्येचं जगप्रसिद्ध बडग्या मारबत उत्सव Marbat Festival साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. संपूर्ण नागपूरकरांना वर्षभर मारबत उत्सवाच्या मिरवणुकीची प्रतीक्षा असते. उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बडगे. वर्षभर घडणाऱ्या घटना आणि विषयांवर आधारित भाष्य करणारे बडगे मिरवणुकीत सहभागी केले जातात. बडग्यांच्या माध्यमातून अनिष्ट रूढी परंपरांवर प्रहार केला जातो, त्याचं बरोबर राजकीय पुढाऱ्यांचे कान देखील टोचले जातात.
संजय राऊत आणि शरद पवारांचे टोचले कान आज तब्बल दोन वर्षांनंतर बडग्या मारबत उत्सव साजरा Marbat Festival Celebrations In Nagpur करण्यात आला. त्यामध्ये काही बडग्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला बडगा म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना उद्देशुन होता. भोंगे झाले बंद, फोकनाड झाले जेल मध्ये बंद अश्या शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेण्यात आला तर लवासा ओके आणि बारामती ओके म्हणत शरद पवारांवर भाष्य करण्यात आले.
स्थानिक समस्यांचे बडगे नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी बडग्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. काय ती स्मार्ट सिटी, काय ते रस्ते, काय ते खड्डे आणि काय ते प्रशासन सर्व ओके म्हणत आपला रोष नागपूरकरांनी व्यक्त केला. याशिवाय बेरोजगार, महागाई यासह अनेक विषयांवर निघालेल्या बडग्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.