ETV Bharat / city

नागपूर : सायकलला जीवनाचा भाग बनवणारा हा 'आंनद' - nagpur breaking news

आजच्या काळात सायकल चालवणे एकतर छंद किंवा प्रकृती चांगली राहावी म्हणूनही उत्त्त्तम पर्याय आहे. पण, नागपुरातील एका व्यक्तीने सायकलीसाठी आपल्या दोन मोटार सायकली विकल्या. त्यानंतर सायकलवारी करत आपल्या जीवनातील 'आनंद' शोधला.

सायकलस्वार
सायकलस्वार
author img

By

Published : Jun 3, 2021, 8:19 PM IST

Updated : Jun 4, 2021, 1:27 PM IST

नागपूर - आजच्या काळात सायकल चालवणे एकतर छंद किंवा प्रकृती चांगली राहावी म्हणूनही उत्तम पर्याय आहे. पण, जर सायकल जीवनाचा अविभाज्य घटक होत चालला असेल तर, यालाच सायकालिस्ट यांच्या भाषेत कम्यूट सायकलिंग असेही म्हणतात. नागपुरात पत्रकारितेत आरोग्य बिटवर काम करणारे आनंद कस्तुरे यांचे सायकलवर निखळ प्रेम आहे. त्यातून जगण्याचा आनंद ते घेत आहेत.

आनंद कस्तुरे यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी

नागपूर सारख्या महानगराच्या शहरात दिवसभर सायकलवर प्रेम करणारे आनंद कस्तुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रासह सायकालिस्ट किंवा दिवसभर सायकलनेच सर्व काम करणारे कम्यूट सायकालिस्ट म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या घडीला ते दिवसभर सायकलने पत्रकारितेचे असाईनमेंट पूर्ण करतात. यासोबत त्याचे काम असो की घरात बाहेरून साहित्य आणायचे असो ते सायकलने जातात. सकाळपासून सुरू होणारा हा प्रवास रात्री घरी पोहचल्यानंतर सायकलवर उतरून थांबतो.

सायकलस्वार
सायकलस्वार

एकाच रात्री दुचाकी विकून सायकल प्रवास सुरू

पण, हे घडण्यामागे एक दिवस महत्वाचा ठरला. तेही सायकल प्रेमी होण्यापूर्वी इतरांप्रमाणे दुचाकी प्रेमीच होते. यात दुचाकी प्रेमही वेड लावणारे होते. त्यांचाकडे दोन दुचाकी होत्या. हेल्थ बिट संभाळतांना हॅप्पी स्ट्रीट इव्हेंट झाला. अन त्याच्या लक्षात आले की हेल्थ बिट सांभाळत असताना आपण स्वतःच्या हेल्थकडे कधी लक्षच दिले नाही. सगळा वेळ काम करण्यात जात आहे. लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी काम करणाऱ्या पत्रकार स्वतःचा आयुष्यात काहीच करत नाही हेच त्यांना खटकले. मग काय एकाच रात्री निर्णय आणि ड्रीम बाईक विकून मोकळे झाले. या दोन्ही मोटार सायकली विकून सायकल चालवण्याचे ध्येय घेऊन यातच आता त्यांनी 'आनंद' शोधला.

सायकलस्वार
सायकलस्वार

सायकलवरून शहरातील लहान बदल टिपले

सायकलस्वार
सायकलस्वार

सगळे करताना सुरवातीला रोज सकाळी सायकल चालवत असत. पण, एकाच आठवड्यात त्यांनी सर्व काम करून सायकल चालवण्याच्या मोहिमेत सहभागी घेतला. यात सगळा प्रवास हा सायकलने सुरू झाला. इतक्या वर्षात त्यानी शहरातील प्रत्येक बदल बारकाईने टिपला. जे वाहनावर घाईत जाताना शक्य नाही ते सगळे त्यांनी याप्रवासात टिपले.

सायकलस्वार
सायकलस्वार

पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, वेळेचे नियोजन

या सर्वात त्यानी सायकल चालवण्यासोबत स्वतःचे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाल्याचे त्याना वाटते. कुठेही जायचे असले की किमान अर्धा तास अगोदर ते निघून आपले ठिकाण गाठतात. यामुळे वेळेचे नियोजन शिकले. यात ते असेही सांगतात. की सायकल हा रोजच्या जीवनाचा भाग बनवणे काहीच कठीण नाही. यासाठी तुम्ही स्वतः ठरवणे गरजेचे आहे. एकदा ठरवले ते काहीच अशक्य नाही, असेही आनंद सांगतात.

रोजच्या जीवनात मी समस्याचा भाग नसल्याचा 'आंनद' वेगळाच

दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींना समोर जावे लागते. यात प्रवास करणे म्हणजे दुचाकी किंवा चारचाकी चालवने हा पर्याय प्रदूषण वाढवण्यास आपला सहभाग देणे होय. पण, आनंदला याचा भाग नसल्याचा वेगळा आहे असे सांगतात. रोजच्या जीवनात खर्च नाही. प्रदूषण नाही, पर्यावरणाला इजा नाही, गाडी लावण्यासाठी पार्किंगसाठी मारामारी करायची गरज नाही. सामाजिक अंतर, प्रकृती ठणठणीत राहण्यास फायदे, स्वास्थ उत्तम असल्याने दवाखण्याचा खर्च नाही. अनेक समस्यांचा इलाज जर एक सायकल असले तर यापेक्षा आनंदी राहणे दुसरे काय असू शकते, असेही आनंद सांगतात. पण, हे करताना कधीही वाहतूक नियम न मोडता हे जीवन जगण्याच्या आनंदचा हा आनंददायी प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

हेही वाचा - पोलीस वसाहतीमध्येच चोरी; कोविड सेंटरमधून २३ पंख्यासह अनेक वस्तू लंपास करणार अटकेत

Last Updated : Jun 4, 2021, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.