नागपूर - महाराष्ट्र विधीमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचा आज मंगळवारी दुसरा दिवस आहे. आज महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकातून तिनही पक्षांमध्ये समन्वय वाढवण्यावर जोर देण्यात येत आहे.
हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची आणि घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्वपूर्ण नेते सहभागी झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ज्याप्रमाणे गोंधळात गेला त्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर तिनही पक्षांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न