नागपूर - काँग्रेसचे नेते माजी आमदार आशिष देशमुख ( Congress leader Ashish Deshmukh ) अनेक वर्षांपासून वेगळा विदर्भासाठी मागणी रेटून धरत आहे. भारताच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना तशी विनंती करण्यात आली आहे. छोट्या राज्याच्या निर्मिती करून विकासाला चालना द्यावी असे, म्हणत 30 वे राज्य हे विदर्भाला घोषित करून करावी अशी मागणी केली. माजी आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यासंदर्भात पत्र लिहले आहे. यामुळे पुन्हा एकदा वेगळा विदर्भाचा मुद्दा चर्चेत आला.
हेही वाचा - Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत
विदर्भ अजूनही मागासलेला - महाराष्ट्र राज्याच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने होत आहे. विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश मात्र, आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. दरडोई उत्पन्न, वाढलेले सिंचन, आरोग्य सुविधा, शिक्षण, लोकांना सुरक्षितता वाटेल अशी कायदा व सुव्यवस्था, रस्ते, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था, लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना, मुबलक वीज, पर्यायाने वाढलेले रोजगार अशी विविधांगी प्रगती तिथे होते आहे. पण, विदर्भात अजूनही मागासलेला आहे. आर्थिक समृद्ध म्हणुन छोटे राज्य ‘विदर्भ’ निर्माण करण्याची गरज आहे. विदर्भातील लोकांना चांगल्या सुखसुविधा मिळतील, उद्योगधंदे वाढतील, युवकाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असे त्यांनी पत्रात म्हणटले आहे.
वेगळ्या विदर्भाची मागणी - शेतकऱ्यांच्या आत्महत्यां रोखण्यासही मदत होईल. वेगळे विदर्भ राज्य निर्माण झाल्यास २ मराठी भाषिक राज्ये अस्तित्वात येतील. मराठी भाषेची अस्मिता जोपासल्या जाईल. देशात २९ राज्ये आणि ८ लहान केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण स्वत:ला दिलेली भेट म्हणून भारतीय संघराज्यातील ७५ लहान राज्यांची मागणी करणे अवास्तव आहे का? भारतात, एकता विविधतेतून वाहते, उलटपक्षी नाही. भारतात एकूण ७५ लहान राज्यांचे समर्थन करून ते प्रस्तावित करीत आहे. ते नक्कीच देशाला व त्या-त्या राज्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम करतील अश्या पद्धतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. यावेळी विदर्भवादी एकत्र येऊन संविधान चौकातून बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी श्रीहरी आणे देखील उपस्थित होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात होती. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भामध्ये महाराष्ट्र दिनी अनेक ठिकाणी काळा दिवस साजरा केला होता. जेव्हापासून विदर्भाचे अस्तित्व नष्ट झाले, महाराष्ट्र निर्माण झाला त्या दिवसाचा आम्ही वर्षानुवर्ष निषेध करत असल्याचे श्रीहरी आणे यांनी यावेळी सांगितले होते. तसेच वेगळ्या विदर्भाच्या झेंड्याचेही यावेळी ध्वजारोहन करण्यात आले होते. तसेच नागपूरसह विदर्भात निषेध म्हणून विविध आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरंग आणे यांनी त्यावेळी दिली होती.
हेही वाचा - Devendra Fadnavis meets Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट; शर्मिला ठाकरेंकडून औक्षण