नागपूर : नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे सौर कुंपण पार करत (leopard crossedsolar fence) बाहेरील बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना घडली (Leopard Hunted Blackbuck at Gorewada zoo) आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी सुद्धा एका बिबट्याने नऊ हरणांची शिकार केली होती.
बिबट्याने सौर ऊर्जेचे कुंपण ओलांडले - दोन वर्षांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालय सफारी करीत सुरू झाले आहे. सुमारे ४० हेक्टरवर गोरेवाडा प्राणी संग्रहालयात साकारण्यात आले आहे. यामध्ये हरिण, काळविट, पांढरे काळवीट तसेच इतर तृणभक्षी प्राणी आहेत. रात्री बिबट्याने सौर ऊर्जेचे कुंपण ओलांडून काळवीटच्या क्षेत्रात प्रवेश केला. काळवीटची शिकार (leopard crossedsolar fence and hunted blackbuck) केली.
वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न - आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून सारवासारव सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी सुद्धा एका बिबट्याने नऊ हरणांची शिकार (Leopard Hunted Blackbuck) केली होती.