ETV Bharat / city

नागपूरमध्ये भुकेलेल्यांच्या दारी 'लंगर सेवा'

भुकेलेल्या वर्गाची भूक भागवण्याच काम येथील पेशाने ज्योतिषी असणारे ४१ वर्षीय जमशेदसिंग कपूर हे "लंगर सेवा" म्हणून करत आहेत. कपूर यांची ही सेवा २०१३पासून सुरू आहे.

author img

By

Published : May 7, 2021, 6:03 PM IST

Updated : May 7, 2021, 9:06 PM IST

लंगर सेवा देताना
लंगर सेवा देताना

नागपूर - नागपूरमध्ये कोरोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या परिस्थितीत रोजच्या जेवणाची भ्रांत असलेला वर्ग मोठा आहे. मात्र, अशा भुकेलेल्या वर्गाची भूक भागवण्याचे काम येथील पेशाने ज्योतिषी असणारे ४१ वर्षीय जमशेदसिंग कपूर हे "लंगर सेवा" म्हणून करत आहेत. कपूर यांची ही सेवा २०१३पासून सुरू आहे. २०२०ला कोरोना आजार आला. या आजारामुळे राज्यासह देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीच्या काळात गरजूंसह अनेक वर्गाला जेवणाच्या अडचणी आल्या. या सर्वांची परिस्थिती लक्षात घेऊन कपूर यांनी शक्य होईल त्या भुकेलेल्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना जेवण मिळेल अशी व्यवस्था केली.

लंगर विषयी माहिती देताना जमशेदसिंग कपूर

भूकेला तो आपला
जमशेदसिंग कपूर यांचे प्रेरणास्थान गुरुनानक देव आहेत. गुरूनानक यांच्या "शांती, सद्भाव" या संदेशाला प्रेरणा समजून कपूर यांनी हे काम हाती घेतले आहे. २०१३मध्ये कपूर यांनी या कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात रस्त्याच्या कडेला बेघर असणाऱ्या लोकांना अन्न देण्याच काम त्यांनी केले. त्यानंतर दवाखाने, चौकात एकोप्याने थांबलेले भूकेलेले लोक, यासह जिथे असे गरजू असतात तिथे जाऊन ही सेवा ते देतात. हे भूक भागवण्याच काम करताना कपूर कधीच त्यांची जात-धर्म रंग असा भेदभाव करत नाहीत. जो भूकेलेला त्याला जेवण देण्याच काम ते करतात.

पोटभर जेवण देण्याचा प्रयत्न
लॉकडाऊनमध्ये सर्वकाही बंद असल्याने अशा बेघर आणि जेवणाची भ्रांत असलेल्यांचे जास्त हाल होतात. मात्र, कोणीही वाटसरू असो, त्याला 'एक घास लंगर सेवेचा' या हेतूने सर्वांना तृप्त करण्याच काम कपूर यांनी केले. ते खिचडी घेऊन दररोज शहरात जवळपास पाच फेऱ्या मारतात. ज्यामध्ये रुग्णालय, रिक्षास्थानक यासह इतर ठिकाणीही ते जातात. त्यासोबतच भूकेलेल्या प्रत्येकाला फक्त एक प्लेट खिचडी नाही, तर पोटभर खिचडी देण्याचा प्रयत्न ते करतात.

सर्वांना पौष्टिक आहार
रोज एकच प्रकारची खिचडी न करता त्यामध्ये वेगवेगळ्या डाळींचाही ते समावेश करतात. लोकांंना फक्त खायला मिळायला पाहिजे हा उद्देश नाही. तर, सर्वांना पौष्टिक आहार देण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते सांगतात. कोणीही उपाशी झोपू नये. सर्वांना अन्न मिळावे. या अपेक्षेने आपण हे लंगर सेवा देतो असे कपूर सांगतात. कोरोनाची भीती वाटत नाही का? या प्रश्नावर 'मला कसलीच भीती वाटत नाही. चांगले काम करताना परशमेश्वरसुद्धा पाठीशी राहून मदत करतो' असे जमशेदसिंग कपूर सांगातात. गुरुनानक देव हे इ. १५१२मध्ये नागपूरला आले होते. तेव्हा त्यानी लंगर सेवा सुरू केली होती. त्यापासून प्रेरणा घेऊन आपण हे काम करतो असेही कपूर सांगतात.

हेही वाचा - लॉकडाऊनच्या धसक्याने सोलापुरात खरेदीसाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Last Updated : May 7, 2021, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.