ETV Bharat / city

शस्त्राचा धाक दाखवून तीन अज्ञातांकडून पेट्रोल पंपावर लाखो रुपयांची लूट

कर्मचारी जेवायला बसले असताना तीन दरोडेखोर तोंडावर कापड बांधून पेट्रोल पंपाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी आरोपींच्या हातात कुऱ्हाड आणि चाकू होते. आरोपींनी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत जबर मारहाण केली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली संपूर्ण रक्कम घेऊन पोबारा केला.

author img

By

Published : Sep 14, 2021, 10:35 PM IST

नागपूर - शहरातील सोनेगाव पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या उज्ज्वल नगर येथील पेट्रोल पंपावर तीन अज्ञात आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट केल्याची घटना घडली आहे. रात्री १२ ते १च्या दरम्यान दरोडा पडल्याची घडली घटना आहे.

जबर मारहाण

पोलिसांच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आपले काम आटपून दिवसभराच्या पैशाचा हिशोब केला. दिवसभरात 2 लाख 30 हजारांची रक्कम जमा झाली होती. ती रक्कम ड्रॉवरमध्ये ठेवून कर्मचारी जेवायला बसले असताना तीन दरोडेखोर तोंडावर कापड बांधून पेट्रोल पंपाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी आरोपींच्या हातात कुऱ्हाड आणि चाकू होते. आरोपींनी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत जबर मारहाण केली आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली संपूर्ण रक्कम घेऊन पोबारा केला.

आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती समजताच सोनेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून त्या आधारेच आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.