नागपूर - महाराष्ट्रात सद्या सर्वत्र पाऊस आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून या घटनांमध्ये अनेकांंना आपले प्राण गमवावे लागले. यासदंर्भात आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सद्याची वेळ राजकारण करण्याची नसून लोकांचे अश्रू पुसण्याची असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्यात निर्माण झालेली परिस्थिती भयावह असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 2019 च्या भयावह परिस्थितीत जनादेश यात्रा निघाली होती, असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
'मदत पोहचवण्याचे प्रयत्न सुरू' -
दरम्यान, या सर्व परिस्थितीवर स्वतः मुख्यमंत्री कंट्रोलरूममधून लक्ष ठेवून आहे. तसेच प्रशासनाला आवश्यकत त्या सूचना देण्यात येत आहे. मी सुद्धा पुण्याच्या दौऱ्यावर असताना कामे बाजूला सारून पूरग्रस्त भागात जाऊन आलो आहे, त्या भागात मदत कार्यासाठी कोणी पोहचू शकत नाही, अशी परिस्थिती होती, पण मदत पोहचवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
'ढगफुटी निसर्गाशी छेडखणी केल्याने' -
या पद्धतीच्या ढगफुटी निसर्गाशी छेडखणी केल्याने होत आहे. वृक्षतोड, उत्खनन हा त्याचाच भाग आहे. या सर्वबाबी जपल्या गेल्या पाहिजे. यासाठी पॉलिसी तयार करण्याची वेळ आली आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, यावर निश्चितपने सरकार विचार करेल, असेही ते म्हणाले.
'केंद्र सरकार मूठभर लोकांचे' -
कोयनेचे पाणी सोडल्याने पाणी पातळी वाढली आहे. मात्र, वरच्या भागात पाऊस कमी झाल्याने परिस्थिती आटोक्यात येत आहे. केंद्र सरकार सर्व सामान्य लोकांचे नसून मूठभर लोकांचे राहिले आहे. त्यामुळे न बोललेले बरं, असे म्हणत काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्य जनतेच्या पक्ष आहे. जनतेत जाऊन काम करतात. काँग्रेस पक्ष राजकारणापलीकडे जाऊन मदत करतो. ही वेळ राजकारणाची नसून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह शोधण्याची आहे, लोकांना मदत करण्याची आहे, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
'निवडणुकीची पॉलिसी ठरली आहे; त्यावर बोलणार नाही' -
निवडणुकीची पॉलिसी ठरली आहे. यामुळे यावर जास्त बोलणे योग्य नाही. पक्ष संघटना वाढवणे बैठका घेणे, ही प्रक्रिया ते चालत राहणार आहे. निवडणुकीची तयारी करणे हे सुरू राहील. पण आज महत्त्वाचे म्हणजे डिझेल पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तू बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्नांना न्याय देण्यासाठी काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा करत आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे महाड दौऱ्यावर रवाना, तळई गावाला देणार भेट