ETV Bharat / city

Inter Model Station Nagpur : गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला दुसरीकडे हलवण्याचे संकेत; आदित्य ठाकरेंनी केली पाहणी - आदित्य ठाकरे नागपुरात

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या इंटर मॉडल स्टेशनला दुसरीकडे हलवला जाऊ शकतो, असे संदेश दिले. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुद्धा हा प्रोजेक्ट्स दुसरीकडे हलवण्यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना समोरासमोर येणार का असे चित्र निर्माण झाले आहे.

Inter Model Station Nagpur
Inter Model Station Nagpur
author img

By

Published : Feb 15, 2022, 7:17 AM IST

नागपूर - अजनी वन परिसरात प्रस्तावित असलेलं इंटर मॉडेल स्टेशन म्हणजे मुंबईतील आरे प्रकल्पासारखचे प्रकरण आहे. मुंबईत आरे येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडला कोणाचाही विरोध नव्हता. त्यामुळे त्याजागेवर कारशेड केले जात होते. मात्र त्या जागेला विरोध होता असे सांगून पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या इंटर मॉडल स्टेशनला दुसरीकडे हलवला जाऊ शकतो, असे संदेश दिले. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुद्धा हा प्रोजेक्ट्स दुसरीकडे हलवण्यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना समोरासमोर येणार का असे चित्र निर्माण झाले आहे.

गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला दुसरीकडे हलवण्याचे संकेत

अजनी वनची केली पाहणी -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांना अजनी वन बचाव मोहीम राबवत असलल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. अजनी परिसरात प्रस्तावित असलेला इंटर मॉडेल स्टेशन खापरी या ठिकाणी होऊ घातलेल्या लॉजिस्टिक हबच्या बाजूला करता येऊ शकते, असा प्रस्ताव अजनी बचाओच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे स्वतः काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांसोबत अजनी वन या ठिकाणी पोहोचून तिथल्या झाडांची पाहणी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना दिवसभरात जेव्हा जेव्हा माध्यमांशी बोलले तेव्हा तेव्हा एक शब्द सातत्याने म्हणाले की आमचा विकासाला विरोध नाही. पण विकास कामे होतांना शाश्वत विकास झाला पाहिजे असे ते म्हणाले. मात्र, अजनी येथे प्रस्तावित असलेले इंटर मॉडेल स्टेशन नागपूरच्या आजूबाजूला दुसरीकडे करू शकतो असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे नागपूरच्या केंद्रस्थानी असलेल्या अजनी परिसरात प्रस्तावित असलेला इंटर मॉडेल स्टेशन प्रस्तावित ठिकाणी होणार की दुसरीकडे केला जाईल, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरेंनी केली पाहणी
आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

प्रकल्प हलविण्याचे संकेत -

अजनी वनची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली. हिरवागार परिसर आहे. इथे हेरिटेज बंगलो आहेत, जैव विविधता आहे. जेव्हा मोठ्या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित केली जातात, तेव्हा जास्त जागा अधिग्रहित करून जागेचा आणि पर्यावरणाचा नाश होतो, असे म्हणत त्यांनी याठिकाणी इंटर मॉडेल स्टेशन नको असे अप्रत्यक्षरित्या सुचविले आहे. या जागेवर प्रस्तावित असलेला इंटर मॉडल स्टेशन दुसऱ्या जागेवर होऊ शकतो असे सांगत त्यांनी अजनी वन परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याची परवानगी राज्याचा पर्यावरण विभाग देणार नाही, असेही संकेत दिले.

गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंटर मॉडेल स्टेशनच्या माध्यमातून काही विकास करायचा आहे. आमचाही त्या विकासाला विरोध नाही. मात्र हे प्रकल्प नागपूरच्या आजूबाजूला दुसरीकडे करू शकतो. हा राजकीय विषय नाही. त्यामुळे राजकीय संघर्ष किंवा वादाचा मुद्दा न करता झाडे वाचवणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्यावरणाचा विषय असून आम्ही शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने विचार करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या अजनी वन परिसरातील दौऱ्यानंतर आणि तिथे होऊ घातलेले इंटर मॉडेल स्टेशनचे प्रकल्प अजनी वन एवजी दुसरीकडे नेता येऊ शकते. यावर दोन्ही प्रोजेक्ट्कचा विचार करून सांगू असेही अजनी बचाव मोहिमेचे जोसेफ जॉर्ज यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. त्यामुळे वक्तव्यानंतर कुठेतरी अजनी वन बचाव मोहिमेत कार्यरत पर्यावरण प्रेमीमध्ये आनंद दिसून आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.