नागपूर - रेल्वेत यापुर्वी देण्यात येणारे पॅक फूड बंद केले आहेत. त्यामुळे रेल्वेत आता शिजवलेले अन्न प्रवाशांना दिले जाणार असल्याची माहिती क्रेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ( Raosaheb Danve On Cooked Food In Railway ) दिली. ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात केलेल्या आंदोलनाचा समाचार ( Raosaheb Danve On Congress ) घेतला.
प्रसारमाध्यमांना बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, शिजवलेले अन्न येत्या काही दिवसांत सुरु केले जाणार आहे. मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन बाबात त्यांनी सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 7 प्रकल्पाचे डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यात वाराणसी दिल्लीसह मुंबई - नागपुरचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात नागपूर मुंबई बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार होईल. ही बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गाच्या बाजूनेच एलिव्हेटेड पद्धतीने निर्माण होणार असल्याने जागा कमी लागणार आहे. यात अगोदरच काही प्रमाणात जागा उपलब्ध असून, 30 टक्के जागा ही रेल्वे स्टेशनसह अन्य सुविधांसाठी घ्यावी लागेल ती घेऊ, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील वक्तव्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलन पुकारले होते. त्यावर बोलताना दानवे यांनी सांगितलं, महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. त्यामुळेच त्यांनी थोडे अस्तित्व शिल्लक आहे, हे दाखवण्यासाठी आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - Goa Assembly 2022 : 'घोडेबाजारात घोडे विकले जातात, शिवसेनेचे वाघ...,' आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला