नागपूर - शहर आणि जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात मागील 24 तासात 3,104 नव्या कोरोनाबधितांची भर पडली आहे. यात बाधितांच्या तुलनेत दुप्पट जण हे कोरोनामुक्त झाल्याने दिलासादायक आहे. मागील 10 दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून रुग्णसंख्या 3 हजारच्या घरात आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 7 हजारच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात 17 हजार 835 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 3104 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 1614 तर ग्रामीण भागातील 1479 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 73 रुग्ण दगावले असून यात सुद्धा आज घट दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरीचे विक्रम मोडत नवीन विक्रम रचले जात असल्याने भीतीदायक चित्र होते. यात सध्याच्या परिस्थितीत चित्र सुधारत आहे. यामध्ये शहरी भागात 47, ग्रामीण भागात 15 तर जिल्हाबाहेरील 11 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच शनिवारी 6 हजार 544 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत 9 व्या दिवशी घट होऊन 54 हजार 732 वर पोहोचली आहे. यामुळे मागील 10 दिवसात दिवसांत 20 हजारच्या घरात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पूर्व विदर्भात 11 हजार 867 जण झाले कोरोनामुक्त
रविवारी आलेल्या अहवालात पूर्व विदर्भात 11 हजार 867 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 6 हजार 634 जण नव्याने कोरोनाबाधितांची भर पडली आले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 133 जण हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 5233 अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे.
दिलासादायक.. उपराजधानीत बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट
नागपूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात मागील 24 तासात 3,104 नव्या कोरोनाबधितांची भर पडली आहे. यात बाधितांच्या तुलनेत दुप्पट जण हे कोरोनामुक्त झाल्याने दिलासादायक आहे.