ETV Bharat / city

Father sold daughter Nagpur news : दारुड्या बापाने स्वतःच्या मुलीची केली 70 हजारात विक्री, आरोपीला अटक - उत्कर्ष दहिवले मुलगी विक्री नागपूर

दारुड्या बापाने स्वतःच्याच मुलीला पैशासाठी विकल्याची ( Father sold daughter Nagpur news) खळबळजनक घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पत्नीला धमकावून स्वतःच्या एका महिन्याच्या मुलीची 70 हजार रुपयांमध्ये ( Father sold daughter for Rs 70 thousand ) विक्री केली. या संपूर्ण प्रकरणात अनाथालयात कार्यरत एक महिला कर्मचाऱ्याचा सहभाग देखील निष्पन्न झाला आहे.

Father sold daughter Nagpur news
उत्कर्ष दहिवले मुलगी विक्री नागपूर
author img

By

Published : Apr 20, 2022, 10:29 AM IST

नागपूर - दारुड्या बापाने स्वतःच्याच मुलीला पैशासाठी विकल्याची ( Father sold daughter Nagpur news) खळबळजनक घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पत्नीला धमकावून स्वतःच्या ( Daughter sold Nagpur news ) एका महिन्याच्या मुलीची 70 हजार रुपयांमध्ये ( Father sold daughter for Rs 70 thousand ) विक्री केली. या संपूर्ण प्रकरणात अनाथालयात कार्यरत एक महिला कर्मचाऱ्याचा सहभाग देखील निष्पन्न झाला आहे. नवजात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याचा किती सहभाग आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Bullion Robbery Case Nagpur : पडद्या मागील हिरोच्या कर्तव्यनिष्ठेमुळे लागला लूट प्रकरणाचा छडा

भंडारा येथील रहिवासी उत्कर्ष दहिवले ( Utkarsh Dahiwale sold daughter Nagpur news ) नामक व्यक्ती कामाच्या निमित्ताने नागपूरच्या राणी दुर्गावती भागात स्थायिक झाला होता. दरम्यान गेल्या महिन्यात त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना आरोपी उत्कर्ष दहिवलेने दारूचे व्यसन भागवण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलीला विक्रीसाठी काढले होते. याची माहिती उषा सहारे नामक महिलेला समजली. तिने लागलीच दहिवलेशी संपर्क साधून उमरेड येथील एका दाम्पत्यासोबत मुलीच्या विक्रीचा सौदा केला. मात्र, उत्कर्षची पत्नी ईश्वरी यासाठी तयार नव्हती. ती सातत्याने विरोध करत होती. मात्र, उत्कर्षने तिचा विरोध न जुमानता बाळाला 70 हजार रुपयांमध्ये विकले. मिळालेल्या पैशातून त्याने घरात काही वस्तू विकत आणल्या, मात्र बाळाची आई ईश्वरी बाळासाठी व्याकूळ झाली होती. तिने थेट पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याने बाळ विकल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत आरोपी उत्कर्ष दहिवले आणि उषा सहारे या दोघांना अटक केली आहे.

नागपुरात बाळ विक्रीचे रॅकेट सक्रिय ? - गेल्या महिन्यातसुद्धा बाळ विक्रीच्या एका प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला होता. अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ डॉक्टरने हैदराबाद येथील एका दाम्पत्याला विकले होते. डॉक्टरने नवजात बालिकेची सात लाख रुपयांत विक्री केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती.

हेही वाचा - Togadia's challenge to RSS : मोहन भागवतजी पाक वर हल्ला करा मी सोबत असेल - तोगडिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.