ETV Bharat / city

नागपूर मनपाने गाठले लसीकरणाचे मोठे उद्दिष्ट, 97.88 टक्के नागरिकांचा पहिला डोज पूर्ण

नागपूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने विविध शक्कली लढवत कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली. पहिल्या डोजचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाटचाल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल पाच लाख लोकांचे लसीकरण करण्यात यश आल्याने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठे यश मिळवले आहे. यातच 97.88 टक्के नागरिकांनी पहिला तर, 60.67 टक्के नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे.

vaccination nagpur Radhakrishnan b
नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी
author img

By

Published : Dec 4, 2021, 5:12 AM IST

Updated : Dec 5, 2021, 6:56 AM IST

नागपूर - नागपूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने विविध शक्कली लढवत कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली. पहिल्या डोजचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाटचाल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल पाच लाख लोकांचे लसीकरण करण्यात यश आल्याने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठे यश मिळवले आहे. यातच 97.88 टक्के नागरिकांनी पहिला तर, 60.67 टक्के नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने हे उद्दिष्ट कसे गाठले ते जाणून घेऊ.

माहिती देताना महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी

हेही वाचा - Fake Notes Fraud Case : नागपुरात मनोरंजन बँकेच्या खोट्या नोटा देऊन मित्रानेच केली मित्राची फसवणूक

नागपूर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी किंमत मोजावी लागली. ही किंमत पैशात नसून लोकांच्या जिवाने मोजावी लागली होती. त्यामुळे, दुसऱ्या लाटेतून लोकांचे जीव वाचवणे असो की, अनिश्चित असलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका, यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय होता. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम नागपुरात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन, नंतर हळूहळू वयोगटानुसार नागरिकांना लस मिळायला लागली. लोकांनी रांगेत उभे राहून लसीकरण्याच्या मोहिमेला प्रतिसाद दिला. पण, मागील दोन तीन महिन्यांची परिस्थिती पाहता अनके लोक या मोहिमेपासून दूर राहिले. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत ओढून आणण्यासाठी विशेष प्रयत्न नागपूर मनपा आणि आरोग्य विभागाला करावे लागले.

एक महिन्यात गाठला पाच लाखाचा टप्पा

नागपूर मनपाच्या क्षेत्रात 150 च्या वर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. केंद्रावर सोयी सुविधा, लसीचा तुटवडा, नागरिकांचा गोंधळ या सगळ्यांत मोठ्या संख्यने लसीकरण झाले आहे. यात मागील ऑगस्टपर्यंत जे लोक लसीकरण केंद्रावर येत नव्हते त्यांच्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन 'हर घर दस्तक' या मोहिमेतून नागरिकांचे लसीकरण सुरू केले. यामध्ये 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत चार लाख 96 हजार जणांना लसीकरण करण्यात आले. यात 2 लाख 52 हजार 850 जणांनी पहिला डोज घेतला. त्यासोबतच 2 लाख 43 हजार 434 जणांनी दुसरा डोज घेतला आहे. यात 30 नोव्हेंबर पर्यंत 30 लाख 80 हजार 307 जणांचे लसीकरण पूर्ण झाले. तेच 2 डिसेंबर (गुरुवार) पर्यंत 19 लाख 31 हजार 630 म्हणजेच, 97.88 टक्के तर, 11 लाख 89 हजार 420 नागरिकांनी म्हणजेच, 60.67 टक्के नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यात एकूण 31 लाख 13 हजार 859 जणांना वॅक्सिन देणे झाले होते.

हे उपाय ठरले लसीकरण वाढवण्यासाठी कारगर

नागपूर शहरात अनेक मनपाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले नव्हते. यामुळे दोन महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी कर्मचारीच लसीचा पहिला डोज घेणार नाही तर, मग नागरिकांना काय सांगणार. त्यामुळे, त्यांनी लस नाही तर पगार नाही, ही मोहीम राबवत अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले. यासोबतच नागरिक जर लसीकरण करणार नसेल तर, 1 डिसेंबरपासून लस विकत घ्यावी लागेल, या निर्णयाने 'हर घर दस्तकमध्ये' नागरिकांनी सहभाग घेतला. यासोबतच 30 नोव्हेंबरला एका दिवसात 42 हजार 402 जणांनी लसीकरण करून घेत नवीन विक्रम गाठला. यामध्ये 18 ते 44 या वयोगटांतील तरुण वर्गाने 29 हजार 176 जणांनी समोर येत पहिला डोज घेतला तर, 13 हजार 225 जणांनी दुसरा डोज घेतला. यात 10 लाख 50 हजार 611 युवा वर्गातील नागरिकांनी पहिला तर, 5 लाख 39 हजार 124 तरुणांनी दुसरा डोज घेतला आहे.

नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे आरोग्य विभागाचे प्रमुख संजय चिलकर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच, आरोग्य यंत्रणेत प्रत्येकाने आपले प्रयत्न करून पहिला. डोज 100 टक्के लोकांना देण्यासाठीची वाटचाल केली आहे. यात अजूनही दुसरा डोज पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यात 40 टक्के लोक दुसरा डोज घेण्यापासून शिल्लक आहे. अनेक जण 84 दिवसांचा कालावधी लोटून लसीकरणाला जात नसल्याचे समोर आल्याचे आयुक्त यांनी सांगितले. त्यामुळे, उर्वरित सर्व नागरिकांना ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी, स्वतःला सुरक्षित करून घेण्यासाठी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केले आहे.

हेही वाचा - Nagpur Fight against Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

Last Updated : Dec 5, 2021, 6:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.