ETV Bharat / city

Monkeypox : आयसीएमआर-एनआयव्ही, वीआरडीएलकडून मंकीपॉक्सच्या सुमारे 100 नमूना चाचण्या

author img

By

Published : Aug 3, 2022, 4:56 PM IST

आफ्रिकन वंशाच्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा मंकीपॉक्स ( monkeypox ) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप त्याच्या परदेश प्रवासाचा इतिहास समोर आला नाही. मात्र काल त्याची दिल्लीमध्ये मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे देशात एकूण मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 झाली आहे ( 8 monkeypox positive patients in india ).भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (VRDL) ने बुधवारी सकाळपर्यंत सुमारे 100 नमुन्यांची चाचणी केली असल्याचे म्हटले आहे.

Monkeypox
मंकीपॉक्स

पुणे - आफ्रिकन वंशाच्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा मंकीपॉक्स ( monkeypox ) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप त्याच्या परदेश प्रवासाचा इतिहास समोर आला नाही. मात्र काल त्याची दिल्लीमध्ये मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे देशात एकूण मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 झाली आहे ( 8 monkeypox positive patients in india ).भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज (VRDL) ने बुधवारी सकाळपर्यंत सुमारे 100 नमुन्यांची चाचणी केली असल्याचे म्हटले आहे.

100 नमुन्यांची चाचणी - डॉ. प्रज्ञा यादव यांच्या म्हणण्यानुसार, "2 ऑगस्टच्या सकाळपर्यंत आयसीएमआर-एनआयव्ही पुणे आणि वीआरडीएल येथे अंदाजे मंकीपॉक्सच्या 100 नमुन्यांची चाचणी केली." आयसीएमआर-एनआयव्ही, एनसीडीसी आणि देशभर पसरलेल्या 15 प्रयोगशाळा हे काम करत आहे. चाचणी करण्यासाठी एनसीडीसी (NCDC) , दिल्ली आणि (AIIMS) दिल्लीला अभिकर्मक सामायिक केले आहे. (ICMR-NIV) पुणे हे चाचणीसाठी नोडल केंद्र आहे. आणि समन्वय," डॉ प्रज्ञा यादव म्हणाल्या.

नमूना चाचणी ही निरंतर प्रक्रिया - नमुने अद्याप चाचणीसाठी प्रलंबित आहेत का, असा प्रश्न विचारला असता, "सध्यातरी चाचणीसाठी कोणतेही नमुने प्रलंबित नाहीत. नमुना चाचणी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि केली जात राहील".असे त्या म्हणाल्या. "केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे नमुने गोळा केले जातात," असेही त्या पुढे म्हणाल्या. विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी पुढील कोणते पाऊल उचलण्याची शक्यता आहे असे विचारले असता. "मंकीपॉक्स विषाणूचे विलगीकरण व्हेरो पेशींमध्ये केले जाते. असेही डॉ प्रज्ञा यादव यांनी सांगितले.

मंकीपॉक्स रूग्णांची संख्या आठवर - भारतातील मंकीपॉक्स रूग्णांची संख्या मंगळवारी आठपर्यंत पोहोचली. त्यात एक केरळ आणि दुसरा दिल्लीतला आहे. केरळमधील हे प्रकरण एका ३० वर्षीय व्यक्तीचे आहे जो गेल्या आठवड्यात यूएईवरून परतला होता. राज्यातील मंकीपॉक्सची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. विषेश म्हणजे हे सर्व 5 जण यूएईमधून आले होते.

राज्यातून १० संशयित रुग्णांचे सँपल - राज्यातून आता पर्यंत १० संशयित रुग्णांचे सँपल एन आय व्ही. पुणे यांना पाठविण्यात आली आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. एन आय व्ही पुण्यासह मंकी पॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( एम्स) नागपूर इथे होऊ शकते. राज्यातून आता पर्यंत १५ संशयित रुग्णांची सँपल एन आय व्ही. पुणे आणि कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, मुंबई यांना पाठविण्यात आली आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

हेही वाचा - Supreme Court hearing : नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.