ETV Bharat / city

मॅटाडोर-मोटरसायकल धडकेत पती-पत्नी ठार - Nagpur latest

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलिबारा मार्गावर मोंढा बायपास जवळ मोटरसायकल आणि आयशर मॅटाडोर मधे झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार पतीचा आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी मॅटाडोर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आयशर मॅटाडोर-मोटरसायकल धडकेत पती ठार-पत्नी ठार

author img

By

Published : May 14, 2021, 1:21 PM IST

नागपूर - हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलिबारा मार्गावर मोंढा बायपासजवळ मोटरसायकल आणि आयशर मॅटाडोरदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात मोटरसायकल स्वार पतीचा आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. रवीशंकर कुचनकर आणि शारदा कुचनकर अशी मृतांचे नाव आहेत. रवीशंकर यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर शारदा यांचा मृत्यू उपचारादरम्यान रुग्णालयात झाला आहे. घटनेनंतर मॅटाडोर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चालका विरुद्ध गुन्हा दाखल

रविशंकर मारोतराव कुचनकर हे त्यांची पत्नी शारदा कुचनकर यांना घेऊन मोटरसायकलने आमगावकडून हिंगण्याच्या दिशेने जात असताना समोरच्या दिशेने येणाऱ्या आयशर मॅटाडोरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल स्वार रविशंकरचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हिंगणा पोलिसांनी मॅटाडोर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - लसीकरणासाठी राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करू द्या - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.