नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi Jayanti ) आणि खादी हे समीकरण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. एवढेच नाही तर स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून देखील खादी कडे पाहिले जायचे. परंतु काळाच्या ओघात खादीच्या अस्तित्वाची ओळख पुसली जात होती. शेकडो प्रकारचे कापड बाजारात उपलब्ध झाल्याने हळूहळू खादीची चमक फिकी पडत राहिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेल्या खादी वस्त्रांना मागणी देखील ( Demand for Khadi garments ) मिळणे कठीण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून खादीचा आग्रह धरला तेव्हा पासून पुन्हा खादी पासून निर्मित कापडांची मागणी वाढली आहे. आता तर स्टाईल आयकॉन सुद्धा खादी कापडांची ब्रँडिंग करू लागल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )यांनी दिलेल्या स्वदेशीचा नारा कृतीत उतरताना दिसत आहे.
खादी म्हणजे काय : खादीला खद्दर असेही नाव आहे. खद्दर म्हणजे जाडे भरडे कापड. हाताने सूत काढणे आणि त्यापासून कापड विणणे हा धंदा भारतात ग्रामोद्योगच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून केला जातो आहे. महात्मा गांधी आणि 1908 मध्ये चरखा संघाच्या माध्यमातून खादीला महत्त्व मिळवून दिले, त्यानंतर 1957 मध्ये भारतात खादी ग्रामोद्योग आयोग स्थापन करण्यात आली. राज्यात खादी ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून खादीला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
पंतप्रधान मोदींनी धरला खादीचा आग्रह : 2014 यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वीच खादी प्रेमी म्ह्णून ओळखले जाऊ लागले होते. सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी खादीचा आग्रह धरला आहे. भाषणात नेहमीच सांगतात की कुणालाही भेटवस्तू किंवा फुल किंवा गुलदस्त्यात न देता खादी पासून बनविलेल्या वस्तू किंवा वस्त्र भेट द्यावी.नागरिकांच्या अनास्थेमुळे रसातळाला गेलेला ग्रामोद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आता विकसित होऊ लागला आहे.
नागपूर खादी ग्रामोद्योगात कोट्यवधीची विक्री : 2014 पासून खादी ग्रामोद्योगात तयार वस्तू आणि वस्त्रांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कधी काळी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या नागपूर खादी ग्रामोद्योगात कोट्यवधी रुपयांचे वस्त्र विक्री केले जात आहे. महत्वाचे म्हणजे दरवर्षी विक्रीचा आकडा वाढतंच असून कोरोना काळात देखील खादीच्या विक्रीत फारसा फरक पडलेला नव्हता. २०१५-१६ या आर्थिक वर्षात नागपूर खादी ग्रामोद्योगात ९६ लाखांचे वस्त्र विकण्यात आले होते. तर २०१६-१७ मध्ये ८८ लाख रुपयांची वस्त्र विक्री झाली. २०१७ -१८ मध्ये ८० लाख तर २०१८-१९ मध्ये ८८ लाखांचे वस्त्र विकले. २०१९-२० साली कोरोना काळात हा आकडा ६० लाख आणि २०२०-२१ मष्ये ७७ लाख रुपयांचे खादी वस्त्र विकण्यात आले. याशिवाय यावर्षी सहा महिन्यांत ४० लाख रूपयांचे खादी वस्त्र विकण्यात आले असून वर्षां अखेरीस एक कोटी रुपयांची विक्री होईल असा विश्वास इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घर-घर तिरंगा अभियानात २० लाख रुपये किमतीचे तिरंगा झेंडयांची विक्री करण्यात आली आहे.