नागपूर - अरबी समुद्रात तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान मोठे आहे. बार्ज 305 वर झालेल्या दुर्घटनेबद्दल केंद्र सरकारने चौकशीचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणात जी काही कारवाई आवश्यक असेल ती होईलच, एवढ्या लोकांचा मृत्यू होणे ही शोभणारी गोष्ट नाही. चक्रीवादळात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू दुर्दैवाने झाले आहेत. मात्र सर्व ठिकाणी अलर्ट दिलेला होता. नियोजनही चांगले होते, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. ते नागपुरातील विमानतळावर बोलत होते. यावेळी ते नागपुरातून वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघून गेले.
'महाराष्ट्रालाही मदत करायला पाहिजे'
केंद्राने गुजरात वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मागील काळात वादळाने नुकसान झाले. यावेळी तौक्ते वादळाने नुकसान झाले. यामध्ये किमान 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रालाही मदत करायला पाहिजे असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले आहेत.
'मराठा आरक्षणावर निर्णय घेऊ'
मराठा आरक्षण ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आरक्षणाबद्दलचा लढा देण्यासाठी एक उपसमिती आहे. यात सध्याच्या निकालावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अर्थ लावण्यासाठी समिती नेमली आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यावर समजून घेत पुढे कोर्टात फेरयाचिका करण्यासाठी त्या निकलावर अहवाल आल्यावर पुढचा निर्णय राज्य सरकार घेईल असे सांगितले.
'पोलीस भरतीचाही विषय मार्गी लावू'
यावेळी पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. पोलीस विभागातील भरतीबद्दल काम करत आहेत. लवकरच निर्णय घेऊ असे उत्तर त्यांनी यावर दिले. मुंबईत पंतप्रधानांबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस कमिशनर पातळीवरचा विषय, त्याबद्दल मी बोलणे करणे योग्य होणार नाही, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - धक्कादायक : अवघ्या १३ तासात आई, वडील आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू
हेही वाचा - आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट