ETV Bharat / city

Maharashtra violence हिंसक घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जवानांची प्रकृती सुधारत आहे. जवानांनी कौतुकास्पद काम केले आहे. शासकीय धोरणानुसार त्यांना पुरस्कार दिले जातील. त्यापेक्षा अधिक काही करायचे असल्यास मुख्यमंत्री यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Nov 15, 2021, 10:34 PM IST

Updated : Nov 15, 2021, 10:56 PM IST

नागपूर - महाराष्ट्रात त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेच्या दिवशी भाजपचे नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात बसून असल्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला. यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की या सगळ्या घटनेची चौकशी केली जाईल. जे काही तथ्य समोर येतील त्यानंतर कारवाई केली जाईल. ते माध्यमांशी बोलत होते.

गडचिरोली दौऱ्यावरून परत येताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या सी 60 जवानांच्या प्रकृतीबद्दल ऑरेंज सिटी रुग्णालयात माहिती जाणून घेतली. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, तसेच रुग्णालय प्रशासनाचे प्रमुख डॉ. अनुप मरार हे उपस्थित होते.

हिंसक घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल

हेही वाचा-दंगल घडवण्याचे भाजपचे षड्यंत्र.. दंगल हे भाजपचे शेवटचं हत्यार, नवाब मलिकांचा आरोप

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जवानांची प्रकृती सुधारत आहे. जवानांनी कौतुकास्पद काम केले आहे. शासकीय धोरणानुसार त्यांना पुरस्कार दिले जातील. त्यापेक्षा अधिक काही करायचे असल्यास मुख्यमंत्री यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. बक्षीस असलेले काही माओवादी मारले गेले आहेत. मात्र, पोलीस विभागाचा हा गुप्ततेचा भाग असून त्यावर जास्त माहिती देता येणार नाही, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा-आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळला

रझा अकादमीवरील बंदीबाबत चौकशी करून कारवाई-

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात हिंसक घटना घडल्या त्या दिवशी भाजपचे नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यलयात बसले असल्याचा आरोप केला. तसेच या हिंसक घटनेमागे भाजप असल्याचा आरोप केला. त्यावर गृहमंत्री म्हणाले की, त्या आरोपाबद्दल माहिती नाही. पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हिंसक वळण लागले. त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यात ते काही तथ्य समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. रझा अकादमीवरील बंदीबाबत (ban on Raza academy) चौकशीत पुढे येईल त्यानंतर कारवाई केली जाईल.

हेही वाचा-तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंसाचार - शरद पवारांचा भाजपवर निशाणा

कायदा हा सर्वांसाठी समान
अमरावती जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात काही ठिकाणी घडलेलता घटनेनंतर गरजेनुसार शांतता सुव्यस्था कायम ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच नागपूरात जमावबंदी असताना निघालेल्या मोर्चावर कारवाई होणार का या प्रश्नाचे उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले कायदा हा सर्वांसाठी समान आहे. परवानगी नसताना अशा पद्धतीने मोर्चे निघत असतील तर त्या विरोधात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल.

काही नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू-
दरम्यान, जवानांच्या कारवाईत 26 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यातील 15 ते 16 नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. इतर नक्षली हे महाराष्ट्र की छत्तीसगडचे होते, याचाही तपास करून त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

Last Updated : Nov 15, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.