ETV Bharat / city

गृहमंत्री अनिल देशमुख गडचिरोलीतील पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी

पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. 24 तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे घरी न थांबता मी थेट 'फिल्ड'वर जाण्याचे ठरवले, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Nov 14, 2020, 11:32 AM IST

नागपूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर्षीची दिवाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथील पोलिसांसोबत साजरी करण्याच्या निर्णय घेतला आहे. यावेळी "पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. 24 तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे घरी न थांबता मी थेट 'फिल्ड'वर जाण्याचे ठरवले. कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे." असे देशमुख यांनी सांगितले.

आज दुपारी जाणार गडचिरोलीला -

दिवाळीसारखा आनंददायी सण कुटुंबासमवेत, आप्त-मित्रांसह साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते. मात्र पोलिसांना ते प्रत्येकवेळी जमत नाही. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मीच त्यांच्या जवळ जाऊन चार आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. नागपुरातून देशमुख दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होणार आहेत.

हेही वाचा - शरद पवारांचे आईला भावनिक पत्र; म्हणाले झुंज देण्याचे बाळकडू तुमच्याकडूनच

आर आर पाटील यांची झाली आठवण -
राज्याचे उपमुख्यमंत्री असताना आर आर पाटील यांनी स्वतःहून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मागून घेतले होते. त्यांना जमेल तेव्हा ते गडचिरोली गाठून तेथील पोलिसांसोबत वेळ घालवायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर्षीची दिवाळी गडचिरोली पोलिसांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - सालेकसा पोलिसांच्या वाहनाला अपघात; पोलीस शिपायाचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.