नागपूर - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. दरम्यान, काही उद्योग आस्थापना सुरू करण्यासाठी शासनाने सुट दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर तथा विभागात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागाला दिले.
कोणीही अनावश्यक फिरणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, त्याचप्रमाणे भाजीपाला व अन्नधान्य घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. वीज विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीत सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करताना पोलीस अधिकारी दिसून आले.