नागपूर - भूमाफियांच्या त्रासाला कंटाळून दाद मागणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशाने दिलासा मिळाला आहे. पोलीस जिमखाना येथे राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष तक्रार निवारण घेणारे शिबीर घेतले. यामध्ये पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत पोलिसी पद्धतीने भूमाफियांनवर कारवाईच्या सूचना दिल्याने तक्रारदारांना दिलासा मिळाला.
हेही वाचा - भांडणानंतर घरातून निघून आली पश्चिम बंगालची तरुणी, आईवडिलांचा शोध घेत दिले ताब्यात
यात भूमाफियांना निर्बंध घालणारा ‘विशेष तक्रार निवारण शिबीर’ हा पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबिराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यात 75 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांना यावेळी तत्काळ सूचना देण्यात आल्यात. तसेच पोलीस आयुक्त यांनीही दखल घेतली जाईल असे सांगत पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
गुन्हेगारांवर कारवाई सुरूच
वाढत्या गुन्हेगारीला जेरबंद बसविण्यासाठी अनेक असामाजिक तत्त्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. तर काहींना तडीपार करण्यात आले आहेत. तरीदेखील भूखंडाच्या बाबतीत फसवणूक, हवाला ऑपरेटर, भूखंडावर अतिक्रमण, डब्बा ट्रेलर, अवैधधंद्यांना आळा घालून वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने व्हावे, यासाठी विशेष तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात येते.
या शिबिरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या 75 तक्रारी आल्या आहे. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित संस्थेची खातरजमा करावी. कोणाच्याही आमिषांना किंवा भूलथापांना बळी पडू नये. नागरिकांना भयमुक्त जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगत उपास्थिताना विश्वास देण्याचे काम केले.
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने पहिले विशेष तक्रार निवारण शिबिर ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या 50 अर्जांवर पोलीस विभाग तसेच शासनाच्या इतर प्रशासकीय विभागामार्फत कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - लोणावळ्यात प्रदूषण वाढू नये यासाठी 'सायकल डे'चे आयोजन; सुनील शेट्टी यांच्या हस्ते उदघाटन