नागपूर - राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज नागपूर शहरासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे संदर्भात आढावा घेतला. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूर शहर नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.मात्र, शहरातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस महासंचालक म्हणाले आहेत. मधल्या काळात नागपूर शहरात खुनाच्या घटना वाढल्या होत्या. मात्र, पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले, महत्वाचं म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि पोहरादेवी गर्दी प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
गुन्हेगारांना वेसण घालणे पोलिसांसमोर आवाहन -
वाढती गुन्हेगारी रोखणे हे महाराष्ट्र पोलिसांसमोर सर्वात मोठे आवाहन असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढली असल्याचे निदर्शनास येत आल्याने त्याला वेसण घालण्यासाठी नवीन पोलिसांची भर्ती करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सध्या पोलीस विभागात २० हजार पद रिक्त आहेत. २०१९ ची सात हजार पदांची भर्ती प्रक्रिया सुरू असून लवकरच २०२० करीता ८ हजार पोलिसांची भर्ती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी काही बोलण्यास नकार दिलाय त्यांनी अतिशय सावधगिरीची भूमिका स्वीकारली. मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिस करत असून हा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोणत्याही तपासा बद्दल सार्वजनिक वित्त सांगणे योग्य नाही पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास बद्दल पुणे पोलिसांचे तपासी अधिकारी भाष्य करतील त्यामुळे या प्रकरणात कोणतेही वक्तव्य करणार नाही त्यामुळे समजत चुकीची माहिती बाहेर जाईल.
प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार -
आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या संदर्भात काय घडले याची कल्पना नसली तरी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासंदर्भात लेखी निवेदन दिलेले आहे. काय घडले याची माहिती घेतल्यानंतर पोलीस विभागातील कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशन वर जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे म्हणाले आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू झाला प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव -
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांवर राजकीय दबाव आहे का या संदर्भात विचारले असता पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले नाही. इतर विषयांवर बोलताना ते म्हणाले आहे की पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हे ॲक्सिडेंटल देत प्रकरणात मोडते त्यामुळे पुणे पोलीस या प्रकारणाचा तपास ॲक्सिडेंटल देत प्रमाणेच करत आहेत