नागपूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Azadi Ka Amrit Mahotsav केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tricolor Abhiyan मोठया उत्साहात राबविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळत आहे. या अभियानात प्रत्येक कुटुंबाला सहभागी होता यावं म्हणून ध्वजारोहणाच्या नियमात बदल Changes in flag hoisting rules करण्यात आले आहेत. मात्र शासकीय कार्यालयात ध्वजारोहण शिस्तीतच झाले पाहिजे असा नियम कायम आहे.त्यापैकी पहिला नियम म्हणजे तिरंगा झेंडा हाताने कातलेल्या किंवा विणलेलाचं असावा. तो व्यवस्थित घडी केलेलाचं असावा यासह अनेक नियम ध्वजारोहणाचे आहेत,ते आज आपण जाणून घेणार आहोत.
कसा हवा राष्ट्रध्वज शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे काही महत्त्वाचे नियम Rules for unfurling the national flag आहेत. त्यामधला पहिला नियम म्हणजे तिरंगा राष्ट्रध्वज हा खादीचाच असावा, त्याच बरोबर राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या (तयार) कापडापासून तयार केलेला असावा.राष्ट्रध्वज आयातकार आकाराचा असावा.
राष्ट्रध्वज फडकवतानांची काय आहेत नियमराष्ट्रध्वज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत फडकविता येतो. झेंडा कधीही जमिनीवर ठेवता येणार नाही. कधीही झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. ज्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला ध्वजारोहणाचा अधिकार असतो. ज्याप्रमाणे शिस्तीत ध्वजारोहण केलं जातं त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरवण्याची प्रक्रिया देखील पार पाडली जाते.
भारतात कुठे तयार होतात राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रध्वज Tiranga तयार करण्याचा अधिकार खादी विकास तेसचं ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. भारतात प्रामुख्याने दोन ठिकाणी खादीचे राष्ट्रध्वज तयार केले जातात. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी खादी ग्रामोद्योग कडून राष्ट्रध्वजाची वर्षभर निर्मिती केली जाते. याशिवाय कर्नाटक कातील हुबळी येथे देखील राष्ट्रध्वजाची निर्मिती होते. मात्र,आता देशातील अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत.
हेही वाचा Har Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण