ETV Bharat / city

नागपूर शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सरसावले कलावंतांचे हात - nagpur artists news

उड्डाणपुलाच्या खालून प्रवास करणाऱ्या नागपूरकरांना सौंदर्याची अनुभूती यावी, यासाठी उड्डाणपुलांच्या स्तंभांवर विविध प्रकारचे चित्र साकारले जात आहे. शहरातील सदर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या स्तंभांवर 'हस्तांकित' संस्थेच्यावतीने हे मनमोहन चित्र रंगविले जात आहे.

Flyover
Flyover
author img

By

Published : Jan 21, 2021, 3:53 PM IST

Updated : Jan 21, 2021, 4:17 PM IST

नागपूर - वाहतूककोंडी टाळण्यासाठी शासनाकडून विविध मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. याच उड्डाणपुलाच्या खालून प्रवास करणाऱ्या नागपूरकरांना सौंदर्याची अनुभूती यावी, यासाठी उड्डाणपुलांच्या स्तंभांवर विविध प्रकारचे चित्र साकारले जात आहे. शहरातील सदर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या स्तंभांवर 'हस्तांकित' संस्थेच्यावतीने हे मनमोहन चित्र रंगविले जात आहे. विशेष म्हणजे हे चित्र रंगविणारे चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना ही कलाकृती आकर्षित करत आहे.

Flyover
Flyover

चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा समावेश

नागपूर शहर काळाबरोबर झपाट्याने बदलत आहे. नागपूरकरांना शहरातील रस्त्यावरून प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून शासनाकडून विविध मार्गांवर उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. याच उड्डाणपुलांची शोभा वाढविण्यासाठी पुलांच्या स्तंभांवर साकारली जात आहेत विविध आकर्षित चित्रे. शहरातील हस्तांकित कला संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यात नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिवाय या चित्रांमध्ये मॉर्डन आर्ट, क्रीडा क्षेत्राशी संबंधित आर्ट यासह इतरही चित्रप्रकार पाहायला मिळतात. इतकेच नाही तर या चित्रांचे स्वरूप त्या त्या भागातील नागरिकांच्या वास्तव्यावरून साकारण्यात येत असल्याचे कलाकार सांगतात. तर दुसरीकडे शहरातील मानकापूर भागात क्रीडाविश्वाशी संबधित चित्रे पाहायला मिळतात. त्यामुळे आपसूकच या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना ही चित्रे खुणावतात. शिवाय एक चित्रकार म्हणून नागपूरच्या सौंदर्यीकरणात भर घालतांना आनंद वाटतो, अशी भावनाही चित्रकारांनी बोलून दाखविली.

Flyover
Flyover

सौंदर्यीकरणाचे दर्शन घडविण्याचा सोज्वळ प्रयत्न

या आकर्षक आणि मनोरंजक कलाकृतीचे संपूर्ण दर्शन घडण्यासाठी अजून नागपूरकरांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण याच उड्डाणपुलांच्या स्तंभांवर येणाऱ्या काळात नागपुरातील विविध वैभवाचे दर्शन घडविणारी चित्रेदेखील रंगविली जाणार आहे. त्यामुळे ही संकल्पना राबविताना अत्यंत कौतुक आणि आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया हस्तांकितच्या प्रमुखांनी दिली आहे. मनमोहक चित्रांबरोबरच नागपूरकरांना आपल्या शहरात होत असलेल्या सौंदर्यीकरणाचे दर्शन घडविण्याचा हा एक सोज्वळ प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातील इतर कलावंतांनीदेखील या कामाकरिता पुढे यावे, असे आवाहन इतर चित्रकार आणि कलावंत करीत आहेत.

१३८ पिलर्सवर रेखाटली जात आहेत चित्रे

नागपूर शहरातील सर्वात मोठा आणि लांब उड्डाणपूल म्हणून मानकापूर पुलाला ओळखले जाते. हा पूल नागपूर सुधार प्राण्यास (NIT) कार्यालयाजवळून सुरू होतो. तर मानकापूर इन डोअर स्टेडियमच्या गेटजवळ हा पूल समाप्त होतो. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा हा विशाल पूल १३८ पिलर्सवर उभा आहे. हस्तांकित या संस्थेमार्फत हे सर्व १३८ पिलर रंगवून त्यावर विविध विषयांची चित्रे रेखाटण्याचा मानस आहे.

Last Updated : Jan 21, 2021, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.