ETV Bharat / city

सर्वांना विचारात घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेऊ - पालकमंत्री नितीन राऊत

author img

By

Published : Sep 20, 2021, 10:33 PM IST

कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत राहण्यासाठी सर्वांशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

corona Third wave information Nitin Raut
बाळासाहेब थोरात उपस्थिती कार्यक्रम नागपूर

नागपूर - कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग, व्यवसाय, व्यापार सुरळीत राहण्यासाठी सर्वांशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. नागपूर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे का? या संदर्भात हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माहिती देताना नागपूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री

हेही वाचा - नागपूर महानगरपालिकेत प्रशासनाकडून दहा योजनांमध्ये प्रशासनाकडून भ्रष्ट्राचार सुरू असल्याचा भाजप नेत्याचा आरोप

प्रभावती ओझा स्मृती सेवा संस्था, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन या तीन संस्थांच्या पुढाकारातून चर्चासत्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाइन सहभागी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णवाढीचा धोका दिसत आहे. आपण काळजी घेत असलो तरी त्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. यामध्ये सूचना संवादातून येणाऱ्या संकल्पनेचा फायदा तिसऱ्या लाटेशी लढा देताना येईल.

परिसंवादातून महाराष्ट्राला मदत होईल

कोरोनाचे संकट हे तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाने आले असले तरी अर्थव्यवस्था चालली पाहिजे. कोरोनाचे संकट असले तरी त्यासाठी आपल्याला काय करावे लागतील त्यासाठी शासन पाठीशी आहे. पण सर्वांनी ठरवून एकत्र येत आपण या संकटाला समोर गेलो तर नक्कीच मदत होईल. चर्चेतून आपली नियमावली तयार होईल, त्याचा उपयोग महाराष्ट्रालासुद्धा होईल असेही थोरात म्हणालेत.

या चर्चासत्रात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, वेद, एमआयए, क्रेडाई, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, यासह व्यापार - उद्योग, औद्योगिक वसाहती, बिल्डर असोसिएशन व वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग होता. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशासन निर्णय घेत असताना संघटनांच्या अडचणींना लक्षात घ्यावे, अशी मागणी या विविध संघटनांनी केली.

लसीकरणाचे लक्ष्य गाठणाऱ्या वॉर्डला 10 लाख विकास निधी?

ऑक्टोबरमध्ये शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या लाटेत लोकांचा जीव देऊन या कोरोना माहामारीत मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रशासन आणि सरकारचा विचार लोकांचा जीव वाचवण्याचा आहे. 100 टक्के लसीकरण केल्यास, त्या भागाला विकास कामासाठी 10 लाख देऊ अशी चाचपणी करू, अशीही माहिती पालकमंत्री राऊत यांनी दिली. ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही. औषधांचा तुटवडा भासणार नाही, तसेच रुग्णांना सोयीसुविधा देताना अडचणी येणार नाही यासाठी म्हत्वाचे पाऊल उचलल्याची माहिती राऊत यांनी दिली.

सध्या 3 हजार 226 बेड उपलब्ध आहेत. कॉल सेंटर सुरू करण्यात आले. मनपा क्षेत्रात ५६ तर, ग्रामीण भागात 116 अशा एकूण 172 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. 19 सप्टेंबर पर्यंत 19 लक्ष 11 हजार लोकांचे लसीकरण झाले आहेत. तर, नागपूर ग्रामीण भागात 14 लक्ष 46 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मंगळवारपासून जिल्ह्यामध्ये फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात असल्याचेही पालकमंत्री राऊत यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजन साठवणूक क्षमता 300 वरून 500 मेट्रिक टन

प्रशासनाची समान्य माणसाचा जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेला पाठबळ द्यावे. यापूर्वी अनेक साथीचे रोग आले, पण कोरोना जरा वेगळा आजार असल्याने सहज समजून येत नाही, कारण याचे रुग्ण हे झपाट्याने वाढत असतात. सातत्याने सावधगिरी बाळगत बैठका घेतल्या जात आहे, 300 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती, 550 टन क्षमता वाढली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विमला आर यांनी दिली.

प्रश्न लोकांच्या जिवाचा असल्याने लोकांनी समजून घ्यावे

प्रशासनाने आखलेल्या नियमाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन करते. कुठलीही सक्ती न करता केवळ कायदा सुव्यवस्था राबवावी यासाठी महत्वाची पावले उचलली जाते. पोलीस खात्यातील 24 जवान कोरोनाच्या लढ्यात हुतात्मा झाले आहे. त्यामुळे, हा विषय थेट जिवाशी जोडल्या गेल्यामुळे संवेदनशीलतेने समजून घेणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

लहान मुलांसाठी 200 बेडचे रुग्णालय

कोरोनाची साथ आणि व्याप्ती लक्षात घेऊन व्यापारी समुदायाने प्रशासनाला मदत करावी. महानगर वैद्यकीयदृष्ट्या तिसऱ्या लाटेला समर्थपणे सामना करण्यास तयार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले. सर्वात जास्त बेड प्रति 10 लाख लोकसंख्येमागे निर्माण करणारी नागपूर माहनगर पालिका आहे. लहान मुलांना असेलेला धोका लक्षात घेता नागपूर विद्यापीठाच्या जागेवर 200 बेडचे एक रुग्णालय तयार करत आहे. जीएमसी आणि आयजीएमसीतील 25 टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच त्यासाठी लागणारी उपकरणे आणि सोयी सुविधा उभारल्या जात आहे.

हेही वाचा - चेन्नई येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी केली सुखरुप सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.