नागपूर - नागपुरात लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली. दिवसभराची परिस्थितीचा आढावा सायंकाळी घेतला असता नागरिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. तेच वाहतूक पोलिसांनासुद्धा तसा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण हा नागपूरकरांचा समजूतदारपणा, ढगाळ वातावरण की बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या उद्रेकाचा परिणाम? हा प्रश्नच आहे. पण वाढती रुग्णसंख्या पाहता दिवसभरात गर्दी रस्त्यावरून ओसरलेली दिसून आली.
नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. जवळपास 3 हजार चारशेच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले. यामुळे कोरोनाचे संसर्ग वाढताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षात कोरोनाचा उद्रेक असताना यात आताच्या घडीला मिळणारी रुग्णसंख्या अधिक आहे. असे असले तरी त्यात रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण घटले आहे.
हेही वाचा - कराटे चॅम्पियन हेमंत नगराळे भावावरच करायचे प्रात्यक्षिके, कुटुंबीयांनी सांगितल्या आठवणी
कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या तय्यारीत
नागपुरात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढताना दिसून येत आहे. यासोबत रुग्णसंख्या अधिक असल्याने घरात राहून विलगीकरण पाळण्यास अडचणी येत आहेत. परिणामी घरातल्या घरात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यासाठीची व्यवस्था करण्याचा विचार प्रशासन करत आहे. यात प्रशासन व्हिएनआयटी आणि पाचपावली या सेंटरसह अन्य सेंटर सुरू करून घरातून होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.
नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय
नागपुरात वाढती रुग्णसंख्य आणि गर्दी कमी करण्यासाठी दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीस वाहतुकीला परवानगी देण्यात आली. यामुळे बहुतांश काही महत्वाचे कारण असल्याशिवाय दोघे जण फिरणारे रस्त्यावरून कमी झाले आहेत. व्हेरायटी चौकात ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी नागरिक काही प्रमाणात रस्त्यावर कमी असल्याचे दिसून आल्याचे सांगितले.
अत्यावश्यक वस्तूंच्या नावावर फिरणाऱ्यांवर अंकुश
यात अत्यावश्यक सेवेसह भाजीपाला, फळं आणि किराणा दुकानांची बाजार पेठ बंद करून एकट्या दुकानांना परवानगी दिली. यात दुपारी 1 वाजेपर्यंत मर्यादीत वेळ ठेवल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रस्त्यावरून कमी करण्यात प्रशासनाला यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा - धारावीत कोरोना वाढतोय! ३० नवीन रुग्ण, १४० सक्रिय रुग्ण