ETV Bharat / city

World No Tobacco Day: दरवर्षी तंबाखूने ६० लाख लोकांचा मृत्यू, कोरोना काळात हे करा - tobacco day 2021

दरवर्षी तंबाखु दिनानिमित्त (World No Tobacco Day) एक थीम ठरवण्यात येते. यंदा तरुण पिढीला तंबाखूच्या त्रासापासून दूर करण्यावर काम केले जाणार आहे. तंबाखूच्या व्यसनाधीनतेपायी मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत या व्यसनात ओढल्या गेले आहे.

जागतिक तंबाखू नकार दिन
जागतिक तंबाखू नकार दिन
author img

By

Published : May 31, 2021, 8:13 AM IST

Updated : May 31, 2021, 1:48 PM IST

नागपूर - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिन' (World No Tobacco Day) म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 60 लाख लोकांचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. 2030 पर्यंत ही संख्या 80 लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅकोचे 2016 -17 मध्ये सर्वेक्षण झाले असून, यात 15 वर्षांपासून ते वृध्दांपर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, भारतामध्ये 28.6 टक्के लोक तंबाखूचे (world no tobacco day) सेवन करतात. तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 26.6 टक्के एवढे आहे. पण या व्यसनापासून मुक्त होता येते, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक देवेन्द्र पातूकर यांनी केले.

तंबाखूमुळे इतर आजार उद्भवण्याची शक्यता

तंबाखू सेवनामुळे संपूर्ण शरीरावर हानिकारक परिणाम होतात. तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, अंधत्व, श्रवणाचे आजार, पुनरुत्पादन संस्था तसेच पचनसंस्थेचे आजार, क्षयरोग इत्यादी आजार होतात.

कोरोनाच्या लढ्यात तंबाखू सोडल्यास प्रकृती सुधारण्यास फायदा

तंबाखू सोडल्यास 8 तासांमध्ये ऑक्सीजनची पातळी सर्वसाधारण होण्यास मदत होते. 72 तासांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच एका वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका अर्ध्यापेक्षा कमी होतो. शिवाय 15 वर्षांमध्ये हा धोका सामान्य व्यक्तीप्रमाणे राहतो, असेही तज्ज्ञ सांगतात. पण तेच धूम्रपान करत राहिल्यास मृत्यू होण्याचा धोका जवळपास 40 ते 50 टक्यापर्यंत वाढत असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगितले जात आहे.

व्यसनाला घाबरू नका, उपचाराने होते व्यसन दूर

एखाद्या व्यक्तीचे कुठलेही व्यसन उपचाराने आणि दृढ निश्चय केल्यास नाहीसे होऊ शकते. त्यामुळे व्यसन करणार नाही, असा निर्धार करून तंबाखूचा त्याग करा. तंबाखू व ई-सिगारेटला नकार देवून सुदृढ आरोग्याचा स्विकार करा. तंबाखू सोडण्यासाठी मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आपणास निश्चित मदत मिळेल, असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

हेही वाचा - भाच्यानेच मामाचा तलवारीने चिरला गळा; एकास अटक, दुसरा फरार

Last Updated : May 31, 2021, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.