ETV Bharat / city

Fake Notes Fraud Case : नागपुरात मनोरंजन बँकेच्या खोट्या नोटा देऊन मित्रानेच केली मित्राची फसवणूक

नकली नोटा देऊन ( Fraud by Giving Fake Notes ) एका आरोपीने स्वतःच्याच मित्राची तब्बल साडेचार लाख रुपयांची फसवणूक ( Fraud of Four and a Half Lakh Rupees ) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ( Hudkeshwar Police ) ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विनोद बिसन पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपीला अटक
आरोपीला अटक
author img

By

Published : Dec 3, 2021, 8:09 PM IST

Updated : Dec 3, 2021, 8:21 PM IST

नागपूर - लहान मुलांच्या खेळण्यातील (मनोरंजन बँकेच्या) नकली नोटा देऊन ( Fraud by Giving Fake Notes ) एका आरोपीने स्वतःच्याच मित्राची तब्बल साडेचार लाख रुपयांची फसवणूक ( Fraud of Four and a Half Lakh Rupees ) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ( Hudkeshwar Police ) ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विनोद बिसन पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

माहिती देतांना पोलीस अधिकारी

असा घडला प्रकार

या प्रकरणातील तक्रारदार प्रवीण मल्लेवार हा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर आरोपी विनोद बिसन पाटील हा देखील गोंदियाचा रहिवासी असल्याने दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. तक्रारदार प्रवीण मल्लेवार हा कामाच्या निमित्ताने नागपुरात वास्तव्यास आहे. या पुढे नागपूरलाच स्थायिक होण्याच्या विचाराने प्रवीणने प्लॉट घेण्याच्या उद्देशाने साडे चार लाख रुपयांची रक्कम जमवली होती. ही बाब त्याचा मित्र विनोद बिसन पाटील याला माहिती झाली. तू खोलीवर एकटा राहतो. त्यामुळे एवढी मोठी रक्कम सुरक्षित राहणार नाही, असे सांगून विनोद पाटील याने ती रक्कम स्वतःकडे सुरक्षित ठेवतो, असे सांगितले. विनोद पाटील मित्र असल्याने प्रवीणने त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व रक्कम विनोदच्या स्वाधीन केली. या दरम्यानच्या काळात प्रवीणने एक प्लॉटचा सौदा करण्याची तयारी सुरू केली. प्रवीणने विनोदकडे सुरक्षित ठेवलेली रक्कम परत मागितली, तेव्हा विनोदने मनोरंजन बँकेच्या नकली नोटा दिल्याचा आरोप प्रवीणने केला आहे. या संदर्भात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नकली नोटा जप्त करून आरोपी विनोद पाटीलला अटक केली आहे.

आरोपीच्या पत्नी विरुद्ध अद्याप कारवाई नाही

आरोपी विनोद आणि प्रवीण हे जुने मित्र असल्याने त्यांचे संबंध चांगले होते. ज्यावेळी प्रवीणने साडेचार लाख रुपयांची रक्कम विनोदकडे सोपवली. तेव्हा विनोदची पत्नी देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यामुळे तक्रारदाराने फसवणुकीच्या तक्रारीमध्ये विनोदच्या पत्नीचा समावेश केला आहे. पोलिसांनी सध्या महिले विरुद्ध कारवाई केलेली नाही.

हेही वाचा - Son-in-Law Raped on Mother-in-Law : २७ वर्षीय जावयाचा ४५ वर्षीय सासूवर बलात्कार

Last Updated : Dec 3, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.