नागपूर - आजपासून (बुधवारी) राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल)च्या डिन कार्यालयासमोर प्रदर्शन केले. आंदोलनकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात नारेबाजी करत आंदोलन केले.
कोविड महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना कोविड वॉर्डात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून चतुर्थ श्रेणी कर्मचारी, लॅब असिस्टंट आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी काम करत होते. असे असताना देखील अजूनपर्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भत्ते देण्यात आलेले नाहीत. त्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आज हजारो चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, सोबतच खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, अशी मागणी देखील यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली. आज सुरू झालेले आंदोलन उद्या देखील कायम राहणार असून या आंदोलनात नागपूरमधील 6 हजार पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.
हेही वाचा - Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया