ETV Bharat / city

कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात चार हजार राष्ट्रध्वज पोत्यात भरून फेकले - चार हजार राष्ट्र ध्वज तलावाच्या काठावर टाकले

नागपुरात चार हजार राष्ट्र ध्वज तलावाच्या काठावर टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडीपासून काही अंतरावरील कोराडी तलावाला लागून असलेल्या नांदा परिसरात उघडकीस आली आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रीय ध्वज टाकून दिल्याचे पुढे आले आहे. एका बोऱ्यावर मौदा पंचायत समिती असे लिहिलेले आहे.

कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात चार हजार राष्ट्रध्वज पोत्यात भरून फेकले

author img

By

Published : Sep 5, 2022, 6:34 PM IST

नागपूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध होऊ शकले नव्हते. हर घर तिरंगा मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल असा त्यामागचा उद्देश होता. मात्र,अवघ्या काही दिवसात नागपुरात चार हजार राष्ट्र ध्वज तलावाच्या काठावर टाकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडीपासून काही अंतरावरील कोराडी तलावाला लागून असलेल्या नांदा परिसरात उघडकीस आली आहे. चार बोऱ्यांमध्ये हजारो राष्ट्रीय ध्वज टाकून दिल्याचे पुढे आले आहे.

मौदा पंचायत समितीचे नाव - ज्या चार बोऱ्यांमध्ये राष्ट्र ध्वज फेकून देण्यात आले आहेत, त्यापैकी एका बोऱ्यावर मौदा पंचायत समिती असे लिहिलेले आहे. हर घर तिरंगा मोहीम पार पडल्यानंतर कोणीतरी बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी किंवा पुरवठादाराने अशा पद्धतीने राष्ट्रीय ध्वज तलावाच्या काठावर टाकले आहेत का अशी शंका निर्माण झाली आहे.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कोराडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी टाकून देण्यात आलेल्या राष्ट्रीय ध्वजांची संख्या 3 हजार 965 एवढी आहे.

हर घर तिरंगा मोहीम - केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा मोहीम पार पडली. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकावे यासाठी ही मोहीम आखली होती. प्रत्येक कुटुंबाला राष्ट्रीय ध्वज उपलब्ध व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वज माफक किमतीत लोकांना उपलब्ध करून देण्यात आले होते.

हेही वाचा - नागपूर शहरातील तलावात गणेश मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध, वाचा विसर्जन करायचं कुठे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.