ETV Bharat / city

Lata Mangeshkar :सत्कारानंतर लता दीदींनी म्हटले होते पसायदान, माजी महापौरांनी दिला आठवणींना उजाळा

author img

By

Published : Feb 6, 2022, 7:42 PM IST

भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) 1960 च्या एका कटू प्रसंगानंतर जणू नागपुरात न येण्याची शपथच घेतली होती. पण, हृदयनाथ मंगेशकर यांच्या मदतीने ती नाराजी दूर करत 19 नोव्हेंबर, 1996 रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार करण्यात यश आल्याची आठवण तत्कालीन महापौर ( Former Mayor of Nagpur ) कुंदा विजयकर ( Kunda Vijaykar ) यांनी सांगितली.

त्यावेळचे छायाचित्र
त्यावेळचे छायाचित्र

नागपूर - भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) 1960 च्या एका कटू प्रसंगानंतर जणू नागपुरात न येण्याची शपथच घेतली होती. पण, हृदयनाथ मंगेशकर यांच्या मदतीने ती नाराजी दूर करत 19 नोव्हेंबर, 1996 रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ( VCA ) मैदानावर भव्य नागरी सत्कार करण्यात यश आल्याची आठवण तत्कालीन महापौर ( Former Mayor of Nagpur ) कुंदा विजयकर ( Kunda Vijaykar ) यांनी सांगितली. हा सत्कार सोहळा भव्य दिव्य राहिला असून सत्कार कार्यक्रमात त्यांनी गाणे गावे, अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण, सत्कार मूर्तींना गाणे गायला कसे म्हणायचे, असा प्रश्न आयोजकांना पडला. पण, लता दीदींनी हृदयनाथ मंगेशकर यांच्या आग्रहामुळे प्रेक्षकांसाठी पसायदान गायले, अशीही आठवण माजी महापौर कुंदा विजयकर यांनी सांगितली.

माहिती देताना माजी महापौर

लता दीदींना साडी खरेदीची होती आवड - या नागरी सत्कार सोहळ्यानंतर लता मंगेशकर यांच्याशी कुंदा विजयकर यांचे स्नेहबंध नेहमीसाठी जुळले. जेव्हा लता दीदी नागपुरात यायच्या त्यावेळी त्या कुंदा विजयकर यांच्या घरी आवर्जून येत असत. लता दीदींना साड्या खरेदी करण्याची आवड होती. त्यामुळे कुंदा विजयकर त्यांच्यासोबत साड्या खरेदी करायला त्या जायच्या, असेही त्यांनी सांगितले.

कुंदा विजयकर यांनी स्वतः गाडी चालवत नेले होते घरी - एकदातर लता दीदी या नागपुरातील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांना घरी आणण्यासाठी कुंदा विजयकर स्वतः कार चालवत घरी आणले. त्यावेळी कारमध्ये एवढी मोठी व्यक्ती बसल्याने कार चालवताना जीवात जीव नसल्याची आठवण विजयकर यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा - Video : समुद्र, पर्वत, झाडे-वेली याप्रमाणे दीदींचा स्वरही अजरामर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.