नागपूर - प्रेरयसीच्या भेटीला जाण्यासाठी पैसे नसल्याने चक्क ऑनलाईन बनावट तिकीट तयार केले. तिकीट तपासणी दरम्यान तिकीट निरीक्षकाला ही बाब लक्षात येताच लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. वशिष्ठ महर्षी असे 26 वर्षीय युवकाचे नाव आहे.
राजधानी दिल्ली बंगळूरू गाडीने हा युवक प्रेरियसीला भेटीण्यासाठी जात असताना भोपाळ सिंकदराबादचे ऑनलाईन तिकीट बनून बसला. यावेळी बि 10 या बोगीत बसला. यात सीट नंबर 20 ची तिकीट त्याने ऑनलाईन एडिट करून तयार केले होते. यावेळी तिकीटाची विचारणा केली असताना मोबाईलमध्ये दाखले. मात्र, तिकीट निरीक्षकाकडे असणारा चार्ट तपासला असता पीएनआर नंबर मात्र दुसरा असल्याने शंका आली.
तिकीट निरीक्षक कुमावत यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. यावर जीआरपीकडून आरोपीला ताब्यात देण्यात आले. यात तो गुन्हा नोंद करत त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
आतुरतेपायी घेतली भेट -
यात युवक हा इंजिनिर आहे. मात्र, प्रेयसीला भेटायला जाण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कुटुंबियांनी मागितले पण पैसे न दिल्याने त्या प्रियसीला भेटायची असलेली आतुरता पाहता हा चुकीचा निर्णय घेतला. त्याने मोबाईलवर डुप्लिकेट तिकीट एडिट केले होते. टीसीच्या हाताला लागल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जगदाळे यांनी दिली.