ETV Bharat / city

पक्षाचे मेळावे होऊ शकतात मग शिवजयंतीवर निर्बंध का? - देवेंद्र फडणवीस - Shiva Jayanti celebrations in Nagpur

छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध लादणे हे दुर्दैवी आहे. कोरोनाच्या काळात काळजी घेतली पाहिजे हे मान्य आहे. पण ती काळजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतानाच का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यक्रम होतात, मोर्चे निघतात, रॅल्या निघतात त्यावेळी कलम 144 का लागू केले जात नाही. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 19, 2021, 4:54 PM IST

नागपूर - छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध लादणे हे दुर्दैवी आहे. कोरोनाच्या काळात काळजी घेतली पाहिजे हे मान्य आहे. पण ती काळजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतानाच का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यक्रम होतात, मोर्चे निघतात, रॅल्या निघतात त्यावेळी कलम 144 का लागू केले जात नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतानाच निर्बंध का घालण्यात आले? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ते नागपूरमध्ये शिवाजी नगर उद्यानातील शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.

पक्षाचे मेळावे होऊ शकतात मग शिवजयंतीवर निर्बंध का?

निर्बंध लादणे दुर्दैवी

छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध लादणे हे दुर्दैवी आहे. आम्हाला जयंती साजरी करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. या राज्यात मोघलाई सहन केली जाणार नाही, हा स्वतंत्र भारतातील छत्रपती शिवायरायांचा महाराष्ट्र आहे. जर कोणी छत्रपतींच्या जयंतीवर निर्बंध घालत असेल तर आम्ही त्याचा मुकाबला करू, जर कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करून, जयंती साजरी होणार असेल तर मग निर्बंध का घातले जातात? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

जनतेच्या पाठिशी उभे राहाण्याची गरज

हे रयतेच राज्य आहे, लॉकडाऊन नंतर खऱ्या अर्थाने जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज होती. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापत आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत आला असल्याची टीकाही यावेळी फडणवीसांनी केली आहे.

राज्य सरकार जाणीवपूर्वक इंधनाच्या टॅक्समध्ये तडजोड करत नाही

महाराष्ट्रात सरकारचा पेट्रोल डिझेलवर असणारा टॅक्स हा कॅस्केडिंग आहे. केंद्राकडून दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली. तर राज्यात पेट्रोलचे दर 2 रुपयांनी वाढवले जातात. राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना या टॅक्समध्ये तडजोड केली होती. त्याने कुठलेही आर्थिक नुकसान होत नाही. यात फक्त अधिकचा मिळणारा नफा कमी होतो. पण महाविकास आघाडी सरकार या टॅक्समध्ये जाणीवपूर्वक बदल करत नसल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.