ETV Bharat / city

महाविकास आघाडीतील नेत्यांनी संविधान वाचावे - फडणवीस - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज नागपूर

विधानसभेचे अध्यक्षपद नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले आहे. अद्याप काँग्रेसकडून दुसरे नाव सूचवण्यात आले नाही. यामुळे राज्यपालांनी विधानसभा सचिवालयाला पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अध्यक्षांची निवड व्हावी, असे म्हणण्यात आले आहे. दरम्यान यावरून आता राज्यपालांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी संविधान वाचावे

author img

By

Published : Feb 19, 2021, 3:42 PM IST

नागपूर - विधानसभेचे अध्यक्षपद नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले आहे. अद्याप काँग्रेसकडून दुसरे नाव सूचवण्यात आले नाही. यामुळे राज्यपालांनी विधानसभा सचिवालयाला पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अध्यक्षांची निवड व्हावी, असे म्हणण्यात आले आहे. दरम्यान यावरून आता राज्यपालांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते नागपुरात शिवजयंती कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बेलत होते.

राज्यपाल भाजपचे प्रवक्ता असल्याचा आरोप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे प्रवक्ता असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तसेच राजभवन हे भाजपचे मुख्यालय झाल्याची टीका देखील करण्यात येत आहे. आता यात आणखी भर म्हणजे राज्यपालांनी अध्यक्ष निवडीसंदर्भात सचिवालयाला पत्र लिहिल्याने, त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यपाल हे 12 आमदारांच्या नियुक्तीवर बोलत नाहीत, मात्र ते अध्यक्षपदाच्या निवडीवर बोलतात कारण ते भाजपचे कार्यकर्ते असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी संविधान वाचावे

काय म्हणाले फडणवीस?

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांना विधानसेभेचे नियम माहित नाहीत, ज्या लोकांना संविधान माहित नाही, तेच अशा पद्धतीने टीका करतात. त्यांनी जर सविंधान वाचले असते, तर अशी टीका केली नसती. ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त होते, त्यावेळी तात्काळ नवीन अध्यक्षाची तारीख नेमून द्यावी, त्या तारखेला गुप्त पद्धतीने मतदान व्हावे असा नियम असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.