ETV Bharat / city

Exam Fever 2022 : परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आक्रमक

author img

By

Published : Apr 27, 2022, 9:33 PM IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यावर्षीची उन्हाळी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा मिक्समोडमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर विद्यापीठाची वर्ष 2022 ची ( Exam Fever 2020 ) उन्हाळी परीक्षा ऑनलाइन झाली पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ( NCP Students Union ) बुधवारी (दि. 27 एप्रिल) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात जोरदार आंदोलन केले.

Exam Fever 2022
Exam Fever 2022

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यावर्षीची उन्हाळी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा मिक्समोडमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल, असा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नागपूर विद्यापीठाची वर्षे 2022 ची उन्हाळी परीक्षा ( Exam Fever 2020 ) ऑनलाइन झाली पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ( NCP Students Union ) बुधवारी (दि. 27 एप्रिल) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ( Rashtra Sant Tukdoji Maharaj Nagpur University ) प्रशासकीय इमारतीच्या परिसरात जोरदार आंदोलन केले.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आक्रमक

विद्यापीठातील साहित्यांची तोडफोड - विद्यापीठ प्रशासनाने सुरुवातीला काही वेळ आंदोलकांना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश न दिल्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. प्रशासकीय इमारतीचे दार बळजबरीने उघडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. काही आंदोलकांनी खुर्च्या तसेच वॉटर फिल्टरची तोडफोडही केली.

परिक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम - मंत्री उदय सामंत म्हणाले, की विद्यापीठांच्या कुलगुरुच ऑफलाइन परीक्षा घेण्यात, यावी अशी मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठांचे कुलगुरू मंत्र्यांनीच ऑफलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे परिक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा - नागपुरात अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, प्रियकरासह तिघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.