ETV Bharat / city

Maharashtra Load Shedding Reality Check : ऊर्जामंत्री म्हणतात भारनियमन नाही, प्रत्यक्षात नागपुरातच अघोषित भारनियमन - Electricity problem in Nagpur city

ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना भारनियमन होत नसल्याचा दावा केला ( No Load Shedding In Maharashtra ) होता. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी ईटीव्हीने राऊत यांच्या नागपुरातच प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी नागपूर शहरात भारनियम नसले तरी विजेची अनियमितता आढळून ( Electricity problem in Nagpur city ) आली. तर ग्रामीण भागात मात्र अघोषित भारनियमन सुरु असल्याचे समोर आले ( Unannounced Load Shedding in rural Nagpur ) आहे.

Unannounced Load Shedding in rural Nagpur
नागपुरातच अघोषित भारनियमन
author img

By

Published : Apr 21, 2022, 5:37 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपूर हे ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांचे शहर आहे. याच शहरातील उत्तर नागपूर मतदारसंघातून ते येतात. नुकत्याच ईटीव्ही भारताच्या विशेष मुलाखतीत राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी ( No Load Shedding In Maharashtra ) केला. यावरच 'ईटीव्ही भारत'ने वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात शहरात भारनियमन नाही हे खरे असले ( Electricity problem in Nagpur city ) तरी, ग्रामीण भागात काही ठिकाणी अल्प प्रमाणात का होईना अघोषित स्वरूपाचे भारनियमन होत आहे. यात नागपूर आणि वर्धा मिळून 10 फिडर आहेत. ते जी1, जी2 आणि जी3 च्या वर्गवारीत मोडत असल्याने त्याच ठिकाणी ग्रामीण भागात भारनियमन होत ( Unannounced Load Shedding in rural Nagpur ) आहे.

ठराविक फिडरवर भारनियमन : नागपूर जिल्ह्यातील हा भाग एबीसी (ABC) वर्गात मोडतो. त्यामध्ये विजेची गळती आणि थकबाकी नसल्याने नागपूर शहरात विजेचे भारनियमन केले जात नाही. पण इतर तालुक्यातील काही ठराविक गावात काही फिडर असे आहेत की, त्याठिकाणी अल्प स्वरूपात काही मिनिटांसाठी भारनियमन केले जाते. दुरुस्तीची कामे असल्यास अश्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

ऊर्जामंत्री म्हणतात भारनियमन नाही, प्रत्यक्षात नागपुरातच अघोषित भारनियमन

ऑनलाईन एसएमसने दिली जाते लोडशेडिंगची माहिती : महावितरणकडे सुमारे 12 लाखापेक्षा अधिक ग्राहक हे ऑनलाईन एसएमएस सुविधेशी जोडले आहे. त्यामुळे शहरातील किंवा ग्रामीणमध्ये कुठल्याही भागात तांत्रिक बिघाड झाल्यास तशा पद्धतीने लोडशेडिंगची माहिती मोबाईल क्रमांकवर दिली जाते. त्यामुळे पूर्वसूचना दिल्याने लोकांना आपले काम वेळेत करून घेऊन त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. यात एसएमएसशी जोडलेले शहरात 8 लाखाच्यावर ग्राहक आहेत. तेच ग्रामीण भागातही सुमारे तीन लाख ग्राहक जोडले आहेत. पण जे ग्राहक जोडलेले नाहीत, त्यांना मात्र अचानक होणारे असो की नियोजित असो भारनियमनचा त्रास सहन करावा लागत आहे.

कामाचा खोळंबा : नागपूरच्या वाहने लेआऊटमध्ये सचिन भोपे हे राहतात. कोविडपासून वर्क फ्रॉम होम सुरू असल्याचे ते सांगतात. यात भारनियमन नसले तरी, अधून मधून खंडित होणारा वीज पुरवठा हा कामात व्यत्यय निर्माण करणारा ठरत आहे. अचानक कधी पाच तर कधी 10 ते 20 मिनिटांसाठी वीज बंद होते. त्यामुळे लाईन जरी पाच मिनिटांसाठी गेली तरी कामाचा खोळंबा मात्र जास्त वेळेसाठी होतो. बरेचदा संगणक सुरू करण्यासाठी लागणार वेळ, काम अर्धवट बंद होणे असे अनेक प्रकार आहेत. जे अडचणीचे ठरत असल्याचे ते सांगतात. हा प्रकार या भागातील सर्वच भागावत जाणवत असल्याचेही सचिन भोपे सांगतात.

खूप नसला तरी अधून- मधून पुरवठा खंडित होतो : हा त्रास एकाचा नसून शहरात मागील काही दिवसांपासून हा त्रास अनेक भागात जाणवत आहे. खासकरून उन्हाळा तापायला लागला असल्याने अधिक जाणवत आहे. बुधवार हा दिवस तसा लोडशेडिंगचा आहे. पण अधून- मधून हा त्रास जाणवतो. यातच सिंगल फेज लाईनवर जास्त त्रास अनुभवायला येतो. रुग्णालयात अचानक मशिन्स बंद पडणे, किंवा लोड वाढल्याने काही प्रमाणात त्रास होत असल्याचा अनुभव रुग्णालय व्यवस्थापक अमर काळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितला.

भारनियमन नाही ? : यात सध्याच्या घडीला कोळश्याच्या तुटवड्याचा प्रश्न सुटला असल्याने राज्यात भारनियमन नाही, असा दावा ऊर्जामंत्री करतात. पण नागपूर जिल्ह्यात काही भागात खासकरून जी1 जी2 आणि जी3 या फिडरवर अल्प प्रमाणात का होईना भारनियमन जे अघोषित असून, मागणी पुरवठ्याची तूट भरून काढण्यासाठी होत असल्याचे समोर आले. तेच शहरात अचानक पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी सोडल्यास भारनियमन नसल्याचे रियालिटी चेकमध्ये समोर आले आहे.

हेही वाचा : No Load Shedding In Maharashtra : राज्यात कुठेही भारनियमन नाही - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा, पहा एक्सक्लुसिव्ह मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.