ETV Bharat / city

नागपुरात कोरोना वाढला; पालकमंत्री राऊतांनी दिले शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे आदेश

विदर्भातील नागपूरसह बहुतांश जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागपुरातील शाळा महाविद्यालये, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राऊत यांनी जाहीर केला आहे.

nitin raut
पालकमंत्री नितीन राऊत
author img

By

Published : Feb 22, 2021, 1:01 PM IST

Updated : Feb 22, 2021, 5:16 PM IST

नागपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषत: विदर्भातील नागपूरसह बहुतांश जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागपुरातील शाळा महाविद्यालये, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राऊत यांनी जाहीर केला आहे.

नागपुरात कोरोना वाढला

नागपुरात कोरोनाच्या संक्रमणात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बध कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

या निर्बंधांची होणार अंमलबजावणी

  • आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद
  • मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद
  • 7 मार्च पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील
  • हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील
  • सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील
  • मंगल कार्यालय 25 फेब्रुवारीनंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार
  • 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल; मंगल कार्यालयमध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाहीत
  • बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार
  • नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार.

उपराजधानी नागपुरातील चित्र धडकी भरविणारे आहे. रविवारी जिथे अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंद होता, तिथे नागपुरात नागरिक कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात असल्याचे जिल्हा प्रशासन म्हणत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी ग्रामीण भागात करणार दौरा -

नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि नागपूर ग्रामीण तालुक्यांना जिल्हाधिकारी भेटी देणार आहे. तिथे कोरोनासंबंधी आढावा बैठका घेणार आहेत. नरखेड पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेणार असून या बैठकीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविण्याचे नियोजन, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्प्रेडर तपासणी सद्य:स्थिती आणि मृत्यूचे अन्वेषण आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 22, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.