नागपूर - गणेश उत्सवाच्या काळात राज्यात कुठेही विजेचे भारनियमन होणार नसल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोबतच गणेश मंडळांनी कायद्याच्या मार्गाने वीज जोडणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा - बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - ऊर्जामंत्री बावनकुळे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही तास शिल्ल्क राहिले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी विजेची चोरी न करता अधिकृत वीज जोडणी करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. तसेच राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे, अशा परिस्थितीत भारनियमन करण्यात येणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.