नागपूर : नागपुरात पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होता असताना एका टोळीने डमी परीक्षार्थी बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर गुन्हे शाखेने परिक्षेची पारदर्शकता सिद्ध करत हा प्रकार हाणून पाडला. या याप्रकरणात तिघांना औरंगाबाद येथून पोलिसांनी अटक केली आहे.
प्रत्यक्ष पेपर आणि शारीरिक चाचणी देताना वेगवेगळे परीक्षार्थी असल्याचा पोलीस तपासात पुढे आले आहे. जवळपास 13 लाख रुपये प्रती परीक्षार्थीकडून घेण्याचे ठरल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा-TET exam scam: जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या अजून एका संचालकाला अटक
नागपूरमध्ये पोलीस शिपाई, तसेच पोलीस वाहन ड्रायव्हर पोलीस भरती प्रक्रिया ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली. यामध्ये स्वतःच्या जागी डमी परिक्षार्थींच्या माध्यमातून शारीरिक व बौद्धिक चाचणी पास होत नोकरी मिळवण्याचा हा प्रयत्न होता. तो पोलिसांनी निकाल लागण्यापूर्वीच हाणून पाडल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे. यात पोलिसांनी जयपाल कंकरवार अर्जुन सुलमे या तीन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा-Keshav Upadhye Critisize Nawab Malik : 'परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी नवाब मलिकांचा संबंध, अधिवेशनात पुढे येईल'
यावेळी संपूर्ण भरती प्रक्रिया व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेचे चित्रीकरण तपासत असताना काही उमेदवारांवर संशय आला. यामध्ये मूळ उमेदवाराएवजी डमी उमेदवारांनी लेखी व शारीरिक परीक्षा दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात पोलीस भरती प्रकियेत 60 हजार परीक्षार्थी बसले होते. यात पोलीस वाहन चालक पदासाठी जवळपास 30 हजार आणि नुकत्याच झालेल्या परिक्षेत 18 हजार विद्यार्थी यामध्ये बसले होते. या सर्वांचा डेटा तपासताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा : Nagpur Corona Update : धक्कादायक! नागपुरामध्ये सात दिवसांत तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढला पॉझिटिव्हीटी दर
दरम्यान, राज्यामध्ये टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला आहे. अशातच पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा आढळल्याने परीक्षा प्रक्रियेतील फसवणुकीचे प्रकार चर्चेत आले आहेत.